मुंबईपासून दहा कि.मी. अंतरावर असलेल्या एलेफंटा बेटावरील एलेफंटा गुंफा सागराच्या पाण्याखाली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे असे ‘द वर्ल्ड हेरिटेड अँड टुरिझम’ या अहवालात म्हटले आहे.

एलेफंटा गुंफा या एकूण सात गुंफा असून त्या जागतिक वारसा यादीत आहेत. अलिकडेच ज्या जागतिक वारसा ठिकाणांचा सागरी पातळीपासून संरक्षणाबाबत अभ्यास करण्याचे ठरले आहे, त्या १३० ठिकाणांत एलेफंटा गुंफांचा समावेश आहे.

international monetary fund praises india for maintaining fiscal discipline in election year
निवडणूक वर्षातही भारताकडून वित्तीय शिस्त कायम; आंतरराष्ट्रीय़ नाणेनिधीकडून कौतुक; आघाडीच्या देशांमध्ये स्थान कायम राहणार
google steps to lay off more employees
गूगलकडून कर्मचारी कपातीचे पाऊल; भारतासह इतर देशांमध्ये काही व्यवसायांचे स्थलांतर करणार
8 point 85 percent interest rate on fixed deposits by Bajaj Finance
बजाज फायनान्सतर्फे मुदत ठेवींवर ८.८५ टक्के व्याजदर
india demand of land marathi news
कार्यालयीन जागांच्या मागणीत ४३ टक्के वाढ, पहिल्या तिमाहीत १.६२ कोटी चौरस फुटांचे व्यवहार; बंगळूरुचा सर्वाधिक वाटा

संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम, युनेस्को व काही वैज्ञानिकांनी हा अहवाल जाहीर केला आहे. २०१४ मधील जागतिक विश्लेषणानुसार इन्सब्रक अँड द पोस्टडॅम इन्स्टिटय़ूट ऑफ क्लायमेट इम्पॅक्ट रीसर्च या संस्थांनी हा दावा केला आहे.

युनायटेड एज्युकेशनल , सायंटफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन (युनेस्को) अमेरिकेतील युनियन ऑफ कन्सन्र्ड सायंटिस्ट यांनी दिलेल्या या अहवालानुसार सागरी जलपातळीच्या वाढीने १३० जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळांना धोका आहे, त्यात माँट सेंट मायकेल, टय़ुनिसमधील कारथेज पुरातत्त्व ठिकाण, एलेफंटा केव्हज यांचा त्यात समावेश आहे. माँट सेंट मायकेलला फ्रान्समधील उपसागरामुळे धोका आहे.

अहवालानुसार ३१ नैसर्गिक व सांस्कृतिक वारसा ठिकाणांना जगातील २९ देशांत वाढते तपमान, वितळत्या हिमनद्या, वाढती जलपातळी, टोकाचे हवामान घटक , दुष्काळ व वणवे यांपासून धोके आहेत. एलेफंटा बेटांवर चांगली मंदिरे असून देवतांच्या मूर्ती आहेत व तो संस्कृतीचा एक मोठा ठेवा आहे, ही संस्कृती काही काळापूर्वी नष्ट झाली, त्याचे ते अवशेष आहेत. एलेफंटा गुंफांचा नेमका काळ अजून निश्चित सांगता येत नसला, तरी तो ६ वे ते ८ वे शतक हा असावा, असे मानले जाते.