पाकिस्तान हे दहशतवादी राष्ट्र असून त्याचा वापर ते भारताविरोधात करत असल्याचा आरोप करत भारताने संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत करत पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
काही तासांपूर्वीच नवाझ शरीफ यांनी काश्मीर प्रश्नावर तोडगा काढल्याशिवाय भारत – पाकिस्तानमध्ये शांतता निर्माण होणे अशक्य असल्याचे सांगत बुरहान वानीला शांततेसाठी काम करणारा युवा नेता असल्याचे म्हटले होते.
शरीफ यांच्या आरोपांचा भारताने चांगलाच समाचार घेतला. संयुक्त राष्ट्रसंघातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी इनाम गंभीर यांनी पाकिस्तानची दहशतवाद्याबद्दलची दुटप्पी भुमिका जगासमोर मांडली. त्या म्हणाल्या, पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा सामना आमच्या देशाला करावा लागत आहे. पाकिस्तानच्या या भुमिकेचा फटका संपूर्ण जगाला बसला आहे. आत्मकेंद्रित भूमिकेमुळे पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे केंद्र ठरत असल्याचे सांगत जगाकडून मिळणारी आर्थिक मदत पाकिस्तान दहशतवादाला प्रोत्साहन देण्यासाठी वापरत असल्याचा आरोप केला. पाकिस्तान हा सर्व पैसा ते भारताविरोधात दहशतवाद्यांना लढण्यासाठी दिला जातो. दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणे, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या पैशांचा वापर करतात. अनेक दहशतवादी संघटना आणि त्यांचे नेते पाकिस्तानच्या सहकार्याने मुक्तपणे सगळीकडे वावरतात. अनेक दहशतवादी संघटना खुलेपणाने निधी गोळा करतात, याकडेही गंभीर यांनी संयुक्त राष्ट्रसंघाचे लक्ष वेधले.