संरक्षण दलाने आज संध्याकाळी ७.५० मिनिटांनी आंतरखंडीय मारा करण्याची क्षमता असलेल्या, अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेल्या अग्नी ५ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. अग्नी ५ हे यापुर्वीच विविध चाचण्यांनंतर संरक्षण दलाच्या सेवेत दाखल झालं आहे. ठराविक कालावधीनंतर नियमितपणे केल्या जाणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या चाचण्यांपैकी आजची अग्नी ५ची चाचणी होती. संरक्षण दलासाठी आवश्यक अण्वस्त्रांचे नियंत्रण करणाऱ्या ‘स्ट्रटेजिक फोर्स कमांड’ ( Strategic force command ) या विभागाने ओडिशा इथल्या ऐ पी जे अब्दुल कलाम या बेटावरुन ही यशस्वी चाचणी केली. 

पाच हजार किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर अचुकतेने मारा करण्याची अग्नी ५ क्षेपणास्त्राची क्षमता आहे. अग्नी ५ हे दिड टनाएवढा दारुगोळा किंवा अण्वस्त्र वाहून नेऊ शकते. अग्नी ५ मुळे याआधीच संपूर्ण चीन हा मारक टप्प्यात आला आहे. जगात मोजक्या देशांकडे एवढ्या दूरपर्यंत मारा करणारी क्षेपणास्त्रे आहेत, त्यामध्ये भारताचाही समावेश आहे. 

PM Modi Announces Four Astronauts For India’s Gaganyaan Mission Marathi News, Prashanth Balakrishnan Nair, (Group Captain) Angad Prathap, Ajit Krishnan and Shubanshu Shukla
Gaganyaan Mission : राकेश शर्मानंतर कोणते भारतीय अंतराळवीर अवकाशात जाणार ? पंतप्रधान मोदींनी जाहिर केली चार नावे….
Opportunities for the unemployed Recruitment for more than 20 thousand vacancies
बेरोजगारांना संधी! २० हजारांपेक्षा जास्त रिक्त पदांवर भरती!
Tata Hospital pediatric treatment capacity to increase soon
टाटा रुग्णालयाच्या बालरुग्ण उपचार क्षमतेत लवकरच वाढ
gslv
‘इस्त्रो’ने GSLV रॉकेटला ‘नॉटी बॉय’ असे टोपणनाव का दिले? यामागची नेमकी कहाणी काय?

देशाकडे ‘अग्नी’ या प्रकारातील विविध मारक पल्ला असलेली ५ प्रकारची क्षेपणास्त्रे सेवेत आहेत. अग्नी १ क्षेपणास्त्राची मारक क्षमता ७०० किलोमीटर आहे. तर अग्नी २ चा पल्ला २०००-३०००, अग्नी ३ चा पल्ला ३५००, अग्नी ४ चा पल्ला ४००० आणि अग्नी ५ चा पल्ला ५००० किलोमीटर पेक्षा जास्त आहे.