चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांकडून भारताच्या संरक्षण सिद्धतेसमोर वारंवार उभ्या राहणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी सीमावर्ती भागात रेल्वेमार्गाचे जाळे भारण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. सैन्याच्या, सामग्रीच्या हालचाली जलदगतीने करता याव्यात, यासाठी हे १४ रेल्वेमार्गाचे जाळे विणण्यात येणार आहे. त्याचबरोबर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीकच्या परिसरात ७३ मार्गही बांधले जात आहेत.
जम्मू-काश्मीर, अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड आणि राजस्थान या राज्यांमध्ये १४ विविध रेल्वेमार्गाचे जाळे उभारले जाणार असून त्यापैकी १२ रेल्वेमार्गासाठी सर्वेक्षणाचे कामही पूर्ण करण्यात आले आहे. भारताच्या चीनला लागून असलेल्या सीमारेषेवर ३८१२ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यापैकी ३४०४ किलोमीटर लांबीच्या ६१ मार्गाचे काम ‘बॉर्डर रोडस् ऑर्गनायझेशन’ या संस्थेकडे देण्यात आले आहे.