कॅलिफोर्नियामध्ये एक धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. एका भारतीय डॉक्टरला कुटुंबीयांच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी तुरुंगावासाची शिक्षा झाली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, डॉक्टरने पॅसिफिक कोस्ट हायवेवर आपल्या टेस्ला कारच्या माध्यमातून पत्नी आणि दोन अल्पवयीन मुलांना मारण्याचा प्रयत्न केला होता. भरधाव वेगात असलेल्या कारला तब्बल २५० फूट खोल खड्ड्यात घातली होती. मात्र, सुदैवाने या अपघातातून ते सर्वजण बचावले होते. ही घटना ३ जानेवारी २०२३ मध्ये घडली होती. यानंतर या डॉक्टरवर गुन्हा दाखल झाला होता. आता या घटनेसंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमकं घटना काय?

डॉ.धर्मेश पटेल हे आपल्या कुटुंबासह टेस्ला कारमधून प्रवास करत होते. मात्र, भरधाव वेगात असलेली कार रस्त्याच्या कडेला असलेल्या तब्बल २५० फूट खोल खड्ड्यात त्यांनी मुद्दामहून घातली असल्याचा आरोप त्यांच्यावर होता. या अपघातात सुदैवाने डॉ.धर्मेश पटेल, त्यांची पत्नी आणि त्यांची ४ आणि ७ वर्षांची मुले बचावली हेती. या प्रकरणात डॉ.धर्मेश पटेल सध्या तुरुंगात आहे. आता या घटनेसंदर्भात अधिक माहिती समोर आली आहे.

हेही वाचा : धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर तीन दिवस बलात्कार, चेहऱ्यावर तापलेल्या लोखंडी रॉडने लिहिलं अमन

तज्ञांचे म्हणण्यानुसार धर्मेश हे मानसिक आजाराने त्रस्त होते. त्यामुळे त्यांनी हे भयानक पाऊल उचलले. या प्रकरणासंदर्भात डॉ. मार्क पॅटरसन यांनी आपली साक्ष देताना सांगितले की, धर्मेश पटेल यांना साइकोसिस नावाचा मानसिक आजार आहे. त्यामुळे अपघात घडला त्यावेळी त्यांना आपल्या मागे कोणीतरी लागले आहे, असे वाटत होते. घटनेवेळी आपल्या कुटुंबाचे रक्षण करण्याच्या हेतूने धर्मेशने हे पाऊल उचलले, असे त्यांनी सांगितले. मात्र, सरकारी वकिलांनी मानसिक आजार असल्याचा विरोध केला आहे. तर डॉक्टरांच्या युक्तिवादानुसार पटेल हे नैराश्याच्या आजाराने ग्रस्त असल्याचे आढळले आहे.

दरम्यान, ज्यावेळी ही घटना घडली त्याबाबत धर्मेशच्या पत्नीने सांगितले की, धर्मेश डिप्रेशनमध्ये होता आणि मुद्दामहून गाडी खड्ड्यात घालण्याची त्याची इच्छा होती. मात्र, आपल्या कुटुंबाला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचे धर्मेशचे म्हणणे आहे. हे संपूर्ण प्रकरण अद्याप न्यायालयामध्ये सुरु आहे. धर्मेशला मानसिक उपचारांची गरज असून त्याची तुरुंगातून सुटका करून उपचार मिळावेत, अशी मागणी आहे. यावर आता न्यायालय २ मे रोजी निर्णय घेणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian origin doctor dharmesh patel california accident marathi news gkt