‘इंडियाज मोस्ट वाँटेड’ या कार्यक्रमामुळे प्रकाशझोतात आलेला सुहेब इलियासी याला पत्नीची केल्याप्रकरणी कडकडूम्मा सत्र न्यायालयाने दोषी ठरवले. गुन्हे जगतावर आधारित ‘इंडियाज मोस्ट वाँटेड’ या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनामुळे सुहेब प्रकाशझोतात आला होता.
२८ मार्च, २००० मध्ये सुहेबला पत्नी अंजूची हत्या केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. सुहेबने हुंड्यासाठी पत्नीचा छळ केल्याचा आरोप अंजूच्या कुटुंबीयांनी केला होता.

हत्या झाल्यानंतर ११ जानेवारी, २००० रोजी भारतीय दंड संहितेतील कलम ४९८ अ अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. तीन डॉक्टरांच्या एका पथकाने अंजूचे शवविच्छेदन केले होते. त्यापैकी दोन डॉक्टरांनी ही आत्महत्या असल्याचा निष्कर्ष काढला होता. पण, काही गोष्टींमध्ये असणारी विसंगती लक्षात येताच आपण, हत्येचा गुन्हा नोंदवण्याचा निर्णय घेण्यात आला. याप्रकरणात अजूंच्या कुटुंबीयांनी उच्च न्यायालयाकडे यासंबंधी याचिका दाखल केली. त्यानंतर ६ सप्टेंबर, २००४ मध्ये या प्रकरणात हत्येच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने खटला सुरु झाला.

वाचा : राज्यातील कारागृहांच्या स्थितीबाबत आदेशांची अंमलबजावणी का नाही?

इलियासीचे गैरव्यवहार, पैशांची अफरातफर आणि काही अवैध धंदे याविषयी अंजूला पूर्ण कल्पना होता. किंबहुना त्याने ही सर्व चुकीची कामं थांबवावीत अशी तिची इच्छा होती. आपल्या बाळासह ती कॅनडाला स्थायिक होऊ इच्छित होती. पण, इलियासी तिच्या विरोधात होता. त्यामुळेच त्याने अंजूची हत्या केली आणि तिने आत्महत्या केल्याचा दिखावा सर्वांसमोर केला. आपल्या पत्नीने स्वत:च स्वत:ला धारदार शस्त्राने दोनदा भोसकून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा इलियासीने केला होता. इतकेच नव्हे तर त्यावेळी आपण तिच्यापासून चार, पाच फुटांच्या अंतरावर असल्याचेही त्याने सांगितले होते.