कितीही खुलेपणा आला असला, तरी लैंगिकता या विषयावर भारतीय समाजात फार खुलेपणानं बोललं जात नाही. त्यात सेक्स टॉय वगैरे मुद्दा म्हणजे फार पुढची गोष्ट. सेक्स टॉयची (Sex Toy) भारतात अजूनही शॉप्स नाहीत. देशातलं पहिलं सेक्स टॉय स्टोअर गोव्यात सुरू करण्यात आलं होतं. कामाकार्ट आणि गिज्मोसवाला या दोन कंपन्यांनी हे दुकान सुरू केलं खरं, पण एका महिन्यातच ते बंद करावं लागलं. स्थानिक पंचायतीने दिलेल्या इशाऱ्यानंतर दुकान बंद करण्यात आल्याचं स्टोअरच्या मालकाने म्हटलं आहे.

गोव्यात सुरू करण्यात आलेल्या Kama Gizmos या सेक्स टॉय दुकान बंद करण्यात आल्याचं वृत्त इंडियन एक्स्प्रेसनं दिलं आहे. फेब्रुवारी २०२१ मध्ये देशातील पहिलं सेक्स टॉईजचं दुकान गोव्याची राजधानी पणजीमध्ये उघडण्यात आलं. आतापर्यंत सेक्स टॉईज हे ऑनलाईन मिळत होते. पण गोव्यातली पर्यटकांची संख्या लक्षात घेऊन कामाकार्ट आणि गिज्मोसवाला कंपन्यांनी सेक्स टॉय विक्रीचं प्रत्यक्ष शॉप सुरू केलं. पणजीतील प्रसिद्ध अशा कलंगुट भागात व्हॅलेंटाईन डेला हे स्टोअर सुरु झालं. गोव्यात सुरू झालेल्या या सेक्स टॉयच्या स्टोअरची चर्चा सगळीकडे सुरू झाली होती.

A 19-year-old girl, Ayesha Rashid
…फिर भी दिल है हिंदुस्तानी! पाकिस्तानमधील १९ वर्षीय आयेशावर भारतात यशस्वी हृदयरोपण शस्त्रक्रिया!
indian died in pakistan custody, vinod laxman kol sailor death pakistan
डहाणूच्या खलाशाचा पाकिस्तानच्या कैदेत मृत्यू, २९ एप्रिल रोजी मृतदेह भारतात येणार; मरणानंतर देखील यातना सुरूच
Operation Meghdoot, Siachen,
विश्लेषण : पाकिस्तानला चकवा देत सियाचिनवर कब्जा… थरारक ‘ऑपरेशन मेघदूत’ मोहीम कशी फत्ते झाली?
mohammed abdul arfath,
एका महिन्यापासून अमेरिकेत बेपत्ता असलेला हैदराबादचा युवक मृतावस्थेत आढळला

१४ फेब्रुवारीला सुरू करण्यात आलेले हे स्टोअर एका महिन्याच्या आत बंद करण्यात आलं. “दुकानाच्या परवान्याची प्रक्रिया अजूनही सुरु आहे. जोपर्यंत ती प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत असं दुकान उघडू नये अशी इशारा स्थानिक प्रशासनानं त्यांना दिला आहे. सोबत आम्ही मूळ गोव्यातील नाही आहोत. बाहेरुन इथं आलेलो आहोत आणि हे दुकान सुरु केलं. त्यामुळे आम्हाला कुणीही सहज निशाणा बनवू शकतात,” असं दुकानाचे संचालक प्रवीण गणेशन यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सांगितलं.

दुकान बंद करण्यामागील भूमिकेबद्दल कलंगुटचे सरपंच दिनेश सीमेपुरूस्कर म्हणाले,”या दुकानाबद्दल नागरिकांच्या तोंडी तक्रारी आपल्याकडे येऊ लागल्या होत्या. कलंगुटमधील प्रसिद्ध अशा बाजारपेठेच्या दर्शनीय ठिकाणीच हे दुकान असल्याने लोकं तक्रारी करत होते. त्याचबरोबर दुकानाला परवाना नसल्याच्या तक्रारीही ग्रामस्थांकडून आल्या. त्यामुळे बुधवारी दुकान बंद करण्यात आलं आणि होर्डिग्जही हटवण्यात आल्या,” असं सीमेपुरुस्कर यांनी सांगितलं. “या दुकानातून सेक्सशी संबंधित वस्तू विकल्या जात होत्या. त्याबद्दल महिला आणि पुरुषांकडूनही तक्रारी आल्या. लोक सोशल मीडियावरूनही तक्रारी करायला लागले होते. अशा स्वरूपाचं दुकान कुणीही यापूर्वी पाहिलेलं नाही,” असं सीमेपुरूस्कर यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सांगितलं.