इस्लामाबाद : अमृतसरहून अहमदाबादला जाणारे इंडिगो एअरलाइन्सचे एक विमान खराब हवामानामुळे भरकटून पाकिस्तानात लाहोरनजिक गेले आणि गुजरानवालापर्यंत जाऊन कुठल्याही अपघाताशिवाय भारतीय हद्दीत परत आले.

फ्लाइट रडारनुसार, ४५४ नॉट इतका वेग असलेले एक भारतीय विमान शनिवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास लाहोरच्या उत्तरेकडे शिरले आणि रात्री ८ वाजून १ मिनिटांनी भारतात परतले, असे वृत्त ‘डॉन’ वृत्तपत्राने दिले. इंडिगो एअरलाइन्सने यावर तत्काळ काही प्रतिक्रिया दिलेली नाही.

pune to dubai flight marathi news
दुबईतील पावसाचा पुणेकर हवाई प्रवाशांना बसतोय फटका
Mumbai flight canceled due to off runway lights at Nagpur airport
नागपूर: धावपट्टीवर अंधार, मुंबई विमान रद्द
Boeing Investment In India
हवेतच विमानाचा दरवाजा निखळला; बोइंग मॅक्स कंपनीची विमानं का होतात दुर्घटनाग्रस्त?
Five Chinese nationals and their Pakistani driver were killed
पाकिस्तानात चीनच्या कर्मचाऱ्यांवर हल्ले सुरूच; आत्मघातकी हल्ल्यात पाच चिनी अभियंते ठार

खराब वातावरणाच्या परिस्थितीत या गोष्टीला ‘आंतरराष्ट्रीय मान्यता’ असल्यामुळे ही असाधारण गोष्ट नाही, असे नागरी हवाई वाहतूक प्राधिकरणाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितल्याचे या वृत्तात नमूद केले आहे.

मे महिन्यात पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचे (पीआयए) एक विमान भारतीय हद्दीत शिरले होते आणि पाकिस्तानातील प्रचंड पावसामुळे सुमारे १० मिनिटे तेथेच थांबले होते. पीके २४८ हे विमान ४ मे रोजी मस्कतहून परतत होते व लाहोरच्या अलामा इक्बाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरण्याच्या प्रयत्नात होते. मात्र, मुसळधार पावसामुळे वैमानिकाला हे बोइंग ७७७ विमान उतरवणे कठीण झाले होते.