scorecardresearch

Premium

महिलेनं ४७ व्या वर्षी केलं लिंगपरिवर्तन, अलकाचा बनला अस्तित्व अन् प्रेयशीसी केला विवाह

इंदोर येथे अलका सोनी हिचा जन्म झाला होता, पण….

As per the tradition, Astitva (earlier known as Alka) and Aastha will solemnise their marriage by taking seven rounds around the sacred fire
४७ व्या वर्षी महिलेने लिंगपरिवर्तन करून प्रेयशीसी विवाह केला आहे. ( छायाचित्र सौजन्य – इंडिया टुडे )

मध्य प्रदेशात एक अनोखा विवाह सोहळा पार पडला आहे. ४७ व्या वर्षी महिलेनं लिंगपरिवर्तन करून प्रेयशीसी लग्नगाठ बांधली आहे. विशेष विवाह कायद्याअंतर्गत अस्तित्व सोनी ( पूर्वी अलका ) यानं आस्था या प्रेयशीसी कौटुंबिक न्यायालयात विवाह केला आहे. या विवाहसोहळ्याला अस्तित्व सोनी आणि आस्थाच्या कुटुंबातील व्यक्ती उपस्थित होते.

इंदोर येथे अलका सोनी हिचा जन्म झाला होता. पण, काही वर्षानंतर अलकाला आपण स्त्री नसल्याची जाणीव झाली आणि पुरूष म्हणून वावरू लागला. अशातच ४७ व्या वाढदिवसाला अलकाने लिंगपरिवर्तन करून स्वत:चं नाव बदललं.

in china son in law service provide by agency
चिनी पुरुष श्रीमंत पत्नीच्या शोधात, घरजावई होण्यास इच्छुक; नेमके कारण काय?
girl committed suicide Pavnur
वर्धा : परीक्षेत नापास होण्याची भीती, शेतकरी कन्येने उचलले टोकाचे पाऊल…
pakistan, chess player, Mian Sultan Khan, honorary title Grandmaster, posthumously, FIDE
विश्लेषण : जन्म भारतात, कर्तृत्व युरोपात नि मृत्यू पाकिस्तानात… मीर सुलतान खान कसे बनले बुद्धिबळातील मरणोत्तर ग्रँडमास्टर?
loksatta readers, feedback, comments , editorial
लोकमानस: देशात बाजारविषयक शहाणीवेचा अभाव

ऑक्टोबर महिन्यात तृतीयपंथी व्यक्तींना विवाह करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयानं दिला. त्यापार्श्वभूमीवर विवाह करण्याचा निर्णय अस्तित्व आणि आस्थानं घेतला.

विवाहानंतर अस्तित्व आणि आस्थानं आनंद व्यक्त केला आहे. आस्थानं सांगितलं, “या विवाहानंतर मी खूप आनंदीत आहे. अस्तित्वची पहिल्यांदा भेट त्याच्या घरी झाली होती. अस्तित्वची बहिण माझी मैत्रीण आहे. या भेटीनंतर नातं प्रेमात फुललं. गेल्या काही महिन्यांपासून दोघं लिव्ह इन रिलेशिपनमध्ये होतो. कुटुंबांच्या संमतीने विवाहाला मान्यता मिळाली.”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Indore alka woman changes gender on 47th birthday to marry lover aastha ssa

First published on: 10-12-2023 at 19:04 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×