“भारतात जेव्हा शेतकरी आंदोलन सुरु होतं तेव्हा आमच्याकडे बऱ्याच मागण्या आल्या. काही पत्रकार हे सरकारवर टीका करत होते. त्यांच्याविषयीच्या या मागण्या होत्या. एक प्रकारे आम्हाला हा इशाराच दिला गेला की आमचं ऐकलं नाही तर भारतात ट्विटर बंद करु. भारत ही ट्विटरसाठी मोठी बाजारपेठ आहे, त्यामुळे आम्हाला काही निर्णय घ्यावे लागले”, असा मोठा दावा ट्विटरचे संस्थापक आणि माजी सीईओ जॅक डोर्सी यांनी केला आहे. यावरून भाजपाच्या आयटी सेलचे राष्ट्रीय संयोजक अमित मालवीया यांनी जॅक डोर्सी यांच्यावर टीका केली आहे.

“जॅक डोर्सी यांनी हेच आरोप अमेरिकेवरही केले होते. ट्विटर ज्या ज्या ठिकाणी कार्यरत आहे त्या प्रत्येक देशासाठी जॅक यांनी असं वक्तव्य केलं आहे. जॅक डोर्सी जेव्हा ट्विटरचे सीईओ होते तेव्हा ट्विटरला मनमानी करायची होती. ते स्वतःला कायद्यापेक्षा मोठे समजत होते”, असा हल्लाबोल अमित मालवीया यांनी केला आहे.

Congress Leader Kamalnath Promised Giving Article 370 Masjid Place But Real Video Is Different
“३७० लागू करू, मशिदीला जागा देऊ..”, काँग्रेसच्या बड्या नेत्याचं मुस्लिमांना आश्वासन? Video तील वाक्य आधी नीट ऐका
miller mathew
“दहशतवाद्यांना घरात घुसून मारू”, मोदींच्या वक्तव्यावर अमेरिकेची प्रतिक्रिया; म्हणाले, “भारत-पाक वादात आम्हाला…”
mayawati bsp in up loksabha
बसपच्या मुस्लिम, ब्राह्मण उमेदवार यादीमुळे इंडिया आघाडीसमोर नवे आव्हान; पारंपरिक व्होट बँकेवर कसा होणार परिणाम?
Prime Minister Narendra Modi statement on terrorists
दहशतवाद्यांचा त्यांच्या भूमीतच खातमा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

हेही वाचा >> “शेतकरी आंदोलनाच्या वेळी मोदी सरकारने धमकावलं”, ट्विटरच्या माजी सीईओच्या आरोपांवर सरकारचं उत्तर, म्हणाले…

“जेव्हा भारतात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो, तेव्हा कोणतंही सरकार संबंधित सोशल मीडिया खाते बंद करण्याचे आदेश देऊ शकते. यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आघात होत नाही. देशातील कायद्यांतर्गत झालेली ही कारवाई आहे. डोर्सीने हेच आरोप अमेरिकेवरही लावले होते. अमेरिकेतील काँग्रेसने चारवेळा त्यांना समोर यायला सांगितलं होतं. कारण, त्यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत सक्रीयपणे एका बाजूचं समर्थन केलं आणि दुसऱ्या बाजूविरोधात कॅम्पेन चालवलं होतं”, असा आरोपही मालवीया यांनी केला आहे.

हेही वाचा >> शेतकरी आंदोलनादरम्यान भारताकडून ट्वीटरला इशारा? सुप्रिया सुळेंचा संताप; म्हणाल्या, “अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच…”

“डोर्सी जेव्हा ट्वीटरचं नेतृत्त्व करत होते, तेव्हा त्यांच्याकडून सार्वभौमत्व कमी करण्याचा प्रयत्न केला जात होता. देशातील राजकारणात ते हस्तक्षेप करत होते. डोर्सी जेव्हा भारतात आले होते तेव्हा त्यांनी राजकीय वक्तव्यही केलं होतं”, असंही मालवीय म्हणाले.

“ट्वीटरला कधी भारतात बंद करण्यात आलं नाही, त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्याला अटक केली नाही किंवा त्यांच्या कार्यालयांवर छापेही टाकले नाहीत. हे सत्य आहे की ट्विटर दोन वर्षांपर्यंत भारताच्या नियमांचं पालन करत नव्हते. त्यांच्यावर जेव्हा दबाव पडला तेव्हा त्यांना भारतीय नियमांचं पालन करावं लागलं. राहुल गांधी परदेशात जातात. भारताविरोधी कारस्थानांमध्ये सहभागी असलेल्या संघटनांना ते भेटतात. ते ज्यांना भेटतात त्याचा खुलासा अद्यापही झालेला नाही. त्यानंतर लागलीच जॅक डोर्सी अशाप्रकराचे वक्तव्य करतात. जॅक डोर्सी हे राहुल गांधी आणि काँग्रेसच्या टुलकिटचा हिस्सा आहेत का? जॅक डोर्सीस यांचा वापर करून काँग्रेस लोकशाहीतून निवडून आलेले सरकार पाडू इच्छिते का? आम्ही पाहिलं की शेतकरी आंदोलन आणि सीएएविरोधातील आंदोलनात ज्या बाहेरच्या ताकदी होत्या त्यांच्या मागे काँग्रेस उभा होता. राहुल गांधी आणि काँग्रेस आता परदशात राहून देशात राजकारण करू पाहताहेत का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.