वृत्तसंस्था, मेलबर्न

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गाझामध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान, इस्रायली लष्कराने हजारो मानवी लक्ष्यांच्या यादी तयार करण्यासाठी एका नवीन कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीचा (‘एआय’) वापर केला असा दावा गेल्या आठवड्यात प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात करण्यात आला आहे. इस्रायली लष्कराने हवाई हल्ल्यांच्या नियोजनासाठी या यादीचा वापर केला असे ‘ ९७२ मॅगेझिन’ या ना-नफा तत्त्वावर चालवल्या जाणाऱ्या नियतकालिकात नमूद करण्यात आले आहे.

‘९७२ मॅगेझिन’ इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या पत्रकारांद्वारे चालवले जाते. या वृत्तासाठी इस्रायलच्या गुप्तचर संस्थांमधील सहा निनावी सूत्रांची मुलाखत घेण्यात आली आहे. सूत्रांनी असा दावा केला की, संशयित अतिरेक्यांना – बरेचसे त्यांच्या स्वत:च्या घरात – लक्ष्य करून ठार करण्यासाठी ‘लव्हेंडर’ ही यंत्रणा इतर ‘एआय’ यंत्रणांबरोबर वापरण्यात आली. त्यामुळे या युद्धात मोठ्या प्रमाणात सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला.

हेही वाचा >>>श्रावण महिन्यात मटणावर ताव; पंतप्रधान मोदी यांची राहुल-लालूप्रसाद यांच्यावर टीका

‘९७२’च्याच सूत्रांच्या आधारे ‘गार्डियन’ या वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या अन्य एका वृत्तामध्ये, एका गुप्तचर अधिकाऱ्याने सांगितले की, या यंत्रणेमुळे मोठ्या प्रमाणात हल्ले करणे सोपे झाले, कारण यंत्राने हे काम थंडपणे केले. या वृत्तांमधून असे दिसते की, मर्यादित अचूकता आणि थोडीही मानवी नजरचूक यामुळे ‘एआय’च्या आधारे करण्यात येणाऱ्या युद्धांमध्ये मोठ्या प्रमाणात मानवी बळी पडण्याचा धोका आहे.

इस्रायलच्या संरक्षण दलाने या वृत्तांमधील अनेक दावे फेटाळले आहेत. ‘गार्डियन’ला दिलेल्या निवेदनामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, ‘‘इस्रायली सैन्य दहशतवादी कारवायांचा वेध घेण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीचा वापर करत नाही’’

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Israel use of ai in war revealed in reports by israeli and palestinian journalists amy
Show comments