शिवखोरी येथे देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची बस १५० फूट कोसळल्याची घटना घडली आहे. या अपघातात २१ प्रवाशांचा मृत्यू झाला असून ४० जण जखमी झाले आहेत. जम्मू काश्मीरच्या अखनूर भागातील पुंछ महामार्गावर हा अपघात घडला. या बसमध्ये सर्व प्रवाशी हे हरियाण्याच्या कुरुक्षेत्र येथील असल्याची प्राथमिक माहिती आहे.

हेही वाचा – पुणे पोर्श कार अपघात प्रकरण ताजे असतानाच आणखी एक अपघात; भरधाव बीएमडब्लूची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू

हिदुस्थान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, ही बस भाविकांना घेऊन जम्मूवरून शिवखोरी देवदर्शनासाठी येथे जात होती. यादरम्यान अखनूरमधील तांडा परीसरात असताना अचानकपणे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि ही बस १५० फूट दरीत जाऊन कोसळली. या अपघात आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, या ठिकाणी बचावकार्य सुरू करण्यात आले असून जखमींना अखनूरमधील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती जम्मूच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. या बसमधील सर्व प्रवाशी हरियाण्याच्या कुरुक्षेत्र येथील असून ही बस शिवखोरी येथे जात होती. या दरम्यान ही बस दरीत कोसळली. याठिकाणी बचावकार्य सुरु करण्यात आले असून जखमींना अखनूर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे ते म्हणाले.

या अपघातानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही दु:ख व्यक्त केलं आहे. एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. जम्मू-काश्मीरच्या अखनूर येथेल्या झालेल्या बस अपघाताच वृत्त ऐकून दु:ख झाले. या अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुबियांप्रती मी संवेदना व्यक्त करते. तसेच जे प्रवाशी जखमी झाले आहेत, ते लवकर बरे व्हावे, यासाठी प्रार्थना करते, असे त्या म्हणाल्या.