पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरण ताजे असतानाच आता पंजाबच्या मोहालीतही अशा एकाप्रकारचा अपघात झाल्याचं पुढे आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून दोघे जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. मोहाली जिल्ह्यातील जीकरपूर येथील पटियाला महामार्गावर बुधवारी रात्री उशीरा ही घटना घडली. दरम्यान या घटनेनंतर मृतकांच्या नातेवाईकांनी पटियाला महामार्ग काळ रोखून धरला होता.

हेही वाचा – Video: “प्रियकराला घाबरविण्यासाठी महिला ट्रॅकवर उतरली आणि तेवढ्यात…”, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल

बुधवारी रात्री उशीरा घडली घटना

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, बनूडकडून मोहालीकडे जाणाऱ्या पटियाला महामार्गावर बुधवारी रात्री उशीरा एका भरधाव वेगाने येणाऱ्या बीएमडब्यू कारने एका दुचाकीला धडक दिली. या धडकेनंतर ही दुचाकी थेट बीएमडब्यू आणि समोर असलेल्या ट्रकच्या मधात जाऊन फसली. बीएमडब्यू गाडीची वेग इतका होता, की ही गाडी दुचाकी धडकताच बीएमडब्यूमधील सर्व एअर बॅग उघडले.

एकाचा मृत्यू दोघे जखमी

या अपघातात एका ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. साहिब पुत्र जाकीर असं मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर सुमित मलकीत जसबीर सिंग हे दोन तरुण गंभीर जखमी झालेल्या तरुणांची नावे आहेत. या अपघातानंतर स्थानिकांनी तिघांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती बघता त्यांना चंदीगडच्या सेक्टर ३२ मधील रुग्णालयात रेफर करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिघांपैकी एकाचा मृत्यू झाला. तर दोघांवर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा – बुलेट आणि स्पोर्ट्स बाइकची धडक; अपघात सीसीटीव्हीत कैद, नक्की चूक कुणाची कळेना? VIDEO एकदा बघाच

काही दिवसांपूर्वी पुण्यातही घडला अपघात

दरम्यान, अशाच प्रकारचा अपघात काही दिवसांपूर्वी पुण्यातही घडला होता. एका भरधाव वेगाने येणाऱ्या पोर्श कारने एका दुचारी स्वाराला धकड दिली होती. या अपघातात दोन अभियंत्यांचा मृत्यू झाला होता. हे प्रकरण ताजे असतानाच आता पंजाबच्या मोहालीतही अशा प्रकारचा अपघात घडला आहे.