कर्नाटक राज्यातील उडिपी जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कौप तालुक्यातील एका कलाकार दाम्पत्याने नैराश्यातून आत्महत्या केली आहे. १६ वर्षांपूर्वी या दाम्पत्याने एका मुलीला दत्तक घेतले होते. सदर मुलगी आता १७ वर्षांची असून ती काही दिवसांपासून बेपत्ता आहे. हे दुःख तिच्या दत्तक आई-वडीलांना सहन झाले नाही. त्यातून ते काही दिवस नैराश्यात होते. त्यातच त्यांनी आत्महत्या केली, असे सांगितले जात आहे. मात्र पोलिसांनी अद्याप याबाबतीत कोणताही खुलासा केलेला नाही. घटनास्थळावरून एक सुसाइड नोट आढळून आली आहे, मात्र त्यावरील मजकुराबाबत अधिक माहिती दिलेली नाही.

उडिपीमधील रंगभूमीवरील प्रसिद्ध कलाकार लीलाधर शेट्टी (६८) आणि त्यांची पत्नी वसुंधरा एल शेट्टी (५९) यांचे मृतदेह मंगळवारी त्यांच्या राहत्या घरात आढळून आले. दोघांनीही गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. पोलिसांमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १६ वर्षांपूर्वी त्यांनी मुलीला दत्तक घेतले होते.

man kidnapped and burnt to killed in gujarat over instagram status
पुणे: ‘म्हाळुंगे किंग’ पोस्ट जीवावर बेतली; अपहरण करून गुजरातमध्ये जाळून केली हत्या, वाचा सगळा घटनाक्रम
vijaysinh mohite patil marathi news, vijaysinh mohite patil solapur lok sabha marathi news
मोहिते-पाटलांच्या महायुती नेत्यांशी गाठीभेटी, भाजप सावध; राजन पाटलांना प्रचारात जुंपले
Orenthal James Simpson
स्पोर्ट्समन, सेलेब्रिटी… मग पत्नीची हत्या, निर्दोष मुक्तता तरी कफल्लक आयुष्य… ओ. जे. सिम्प्सन यांचे आजही अमेरिकेवर गारूड कसे?
Raj Thackerey teaser
VIDEO : राज ठाकरे- अमित शाह यांच्या बैठकीत काय ठरलं? शिवतीर्थवरून मिळणार उत्तर, पाहा पाडवा मेळाव्याचा टीझर!

द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या बातमीनुसार, दाम्पत्य कौप तालुक्यातील मजूर गावात राहत होते. या दाम्पत्याची मुलगी त्यांच्याच घरी काम करणाऱ्या एका व्यक्तीसोबत पळून गेल्याचीही चर्चा आहे. या घटनेमुळे दाम्पत्याला धकका बसला होता.

पोलिसांकडून बेपत्ता मुलीचा शोध सुरू

जनसत्ताने दिलेल्या माहितीनुसार, शेट्टी कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीनंतर सदर बेपत्ता मुलीचा शोध सुरू असून अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार लीलाधर शेट्टी यांनी कौप विधानसभा मतदारसंघातून एकदा निवडणूकही लढविली होती. ग्रामपंचायतीमध्येही त्यांनी काम केलेले आहे. त्यांचे नाट्यमंडळ उडिपीमध्ये लोकप्रिय असून या दाम्पत्याला या भागात मानसन्मान दिला जात होता.

रंगभूमीच्या प्रेमापोटी लीलाधर शेट्टी यांनी रंगतरंग थिएटर संस्थेची स्थापना केली होती. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक नाटके सादर केली. सामाजिक उपक्रमातही दाम्पत्याचा सहभाग असायचा. यासाठी त्यांना अनेकदा विविध पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. मात्र या दाम्पत्याने अचानक जगाचा निरोप घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे कौप तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.