मिझोराममध्ये काँग्रेस उमेदवार जाहीर

चाळीस आमदारांच्या मिझोराम विधानसभेसाठी येत्या २५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकांकरिता काँग्रेस पक्षाने आपल्या उमेदवारांची यादी

चाळीस आमदारांच्या मिझोराम विधानसभेसाठी येत्या २५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकांकरिता काँग्रेस पक्षाने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. काँग्रेसच्या विद्यमान ३२ आमदारांपैकी ३० जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. या निवडणुकीत काँग्रेसने सर्व मतदारसंघांत स्वबळावर लढण्याचे ठरवले आहे.
मिझोरामचे विद्यमान मुख्यमंत्री लाल ठाणावाला यांनी सरच्चिप आणि ऱ्हँगटुझरे या दोन मतदारसंघांतून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मिझोरामचे माजी महसूलमंत्री जे. एच. रोठुआमा आणि माजी मंत्री निरुपम चकमा यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे.
दरम्यान, मिझोराममधील प्रमुख विरोधी पक्ष मिझो नॅशनल फ्रंट, एमपीसी आणि मारालँड डेमोक्रॅटिक फ्रंट या पक्षांनीही एकत्रितपणे १२ उमेदवार जाहीर केले आहेत. उर्वरित उमेदवारांची यादी सोमवारी जाहीर करण्यात येईल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Mizoram polls congress announces list of candidates

ताज्या बातम्या