आपल्या वादग्रस्त विधानांनी कायम चर्चेत राहणारे ऑल इंडिया इमाम असोसिएशनचे अध्यक्ष तथा मुस्लीम धर्मगुरु मौलाना मोहम्मद साजिद रशीदी यांनी पुन्हा एक वादग्रस्त विधान केलं आहे. गुजरातमधील सोमनाथ मंदिर तोडून मोहम्मद गझनीने कोणतंही चुकीचं काम केलं नसल्याचे ते म्हणाले. एनएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – न्यायालयाकडून राज्यघटनेचे अपहरण!, किरण रिजिजूंकडून निवृत्त न्यायमूर्तीच्या विधानाची चित्रफीत प्रसृत

Mallikarjun Kharge interview Congress loksabha elections 2024 PM Narendra Modi BJP
इंडिया आघाडी जिंकली तर नेतृत्व कोण करणार? मल्लिकार्जुन खरगेंनी केला खुलासा
Jan Vikas Foundation supports Dr Prashant Padole of Congress
भंडारा : जनविकास फाऊंडेशनचा काँग्रेसचे डॉ. प्रशांत पडोळेंना पाठिंबा, माजी आमदार चरण वाघमारेंची भूमिका स्पष्ट
PM narendra Modi and Rahul Gandhi
राहुल गांधींच्या टीकेला पंतप्रधान मोदींचे प्रत्युत्तर; म्हणाले, “चुन चुनके…”
Katchatheevu island (1)
काँग्रेसने अख्खे बेट श्रीलंकेला आंदण दिले? पंतप्रधान मोदींनी टीका केलेले हे प्रकरण नक्की आहे तरी काय?

काय म्हणाले मोहम्मद साजिद रशीदी?

८०० वर्षांच्या मुघल साम्राज्यात अनेक बादशाहा होऊन गेलेत. त्यांचा इतिहास वाचला तर त्यांचा धर्माशी काहीही संबंध नव्हता, हे दिसून येईल. त्यांनी धर्माच्या नावावर कोणतंही काम केलं नाही. अशी अनेक उदाहरणं देता येईल. मोहम्मद गझनीबद्दल लोकं म्हणतात, की त्याने सोमनाथ मंदिर तोडले. मात्र, इतिहास असं सांगतो की तेथील काही लोकांनी आस्थेच्या नावावर गैरप्रकार सुरू असल्याची तक्रार गझनीकडे केली होती. त्यानंतर गझनीने मंदिर परिसराची पाहणी केली. जेव्हा त्याला लोकांची तक्रारी खऱ्या आहेत, याची खात्री पटली, तेव्हा त्याने सोमनाथ मंदिरावर हल्ला केला. सोमनाथ मंदिर तोडून त्याने कोणतीही चूक केली नाही. गझनीने तिथे होणाऱ्या गैरकृत्यांना आळा घालण्याचं काम केलं, अशी प्रतिक्रिया रशीदी यांनी दिली.

हेही वाचा – “‘लव्ह जिहाद’वर देशभरात बंदी घालावी”, तेलंगणाचे आमदार राजा भैय्या यांची मागणी; म्हणाले, “धर्मांतर..”

यापूर्वी राम मंदिराबाबत वादग्रस्त विधान

यापूर्वीही रशिदी यांनी राम मंदिराबाबत वादग्रस्त विधान केलं होते. आमच्या भावी पिढ्या राम मंदिर पाडून मशीद बांधतील. आज मुस्लीम शांत आहेत. मात्र, येत्या काळात इतिहास लिहिला जाईल, असं ते म्हणाले होते.