पीटीआय, नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीत या वेळी एकूण ८,३६० उमेदवार रिंगणात आहेत. अधिकृत आकडेवारीच्या विश्लेषणावरून असे दिसून येते की १९९६ च्या लोकसभा निवडणुकीनंतर यंदाच्या निवडणुकीत सर्वाधिक उमेदवार एकमेकांसमोर उभे आहेत. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी २०१९ च्या निवडणुकीत ८,०३९ उमेदवार रिंगणात होते आणि १९९६ मध्ये विक्रमी १३,९५२ उमेदवारांनी निवडणूक लढवली होती. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुका सात टप्प्यात होत आहेत. त्यापैकी मतदानाच्या पाच फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. सहाव्या आणि अंतिम टप्प्यात अनुक्रमे २५ मे आणि १ जून रोजी मतदान होणार आहे. ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशमधील ९६ संसदीय जागांसाठी मतदान झाले. या टप्प्यात सर्वाधिक १,७१७ उमेदवार रिंगणात होते. अधिकृत आकडेवारीनुसार, लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची संख्या १९५२ मध्ये १,८७४ वरून २०२४ मध्ये ८,३६० पर्यंत चार पटीने वाढली आहे.

निवडणूक लढविणाऱ्या एकूण उमेदवारांच्या संख्येत गेल्या काही वर्षांत लक्षणीय वाढ झाली आहे. आकडेवारी दर्शवते की १९८९ मधील नवव्या सार्वत्रिक निवडणुकीत, ६,१६० उमेदवार रिंगणात होते, १९९१-९२ मध्ये, ८,६६८ उमेदवारांनी निवडणूक लढवली. १९९६ मध्ये लोकसभेच्या ५४३ जागांसाठी विक्रमी १३,९५२ उमेदवार रिंगणात होते. आयोगाने सिक्युरिटी डिपॉझिटमध्ये ५०० रुपयांवरून १०,००० रुपयांपर्यंत वाढ केल्याने १९९८ च्या लोकसभा निवडणुकीत उमेदवार कमी झाले. २००४ मध्ये, उमेदवारांच्या संख्येने पुन्हा ५,००० चा टप्पा ओलांडला.

Norway Ireland Spain recognize Palestine
नॉर्वे, आयर्लंड, स्पेनची पॅलेस्टाईनला मान्यता; आणखी एकट्या पडलेल्या इस्रायलकडून संतप्त प्रतिक्रिया
Challenge petition against ED arrest withdrawn by Soren
तथ्य दडपल्याने ताशेरे; ईडीच्या अटकेविरोधातील आव्हान याचिका सोरेन यांच्याकडून मागे
What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
Ian Bremmer prashant kishor
भाजपाला किती जागा मिळणार? प्रशांत किशोरांपाठोपाठ अमेरिकन राजकीय संशोधकाने केलं विश्लेषण
yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
Raghuram Rajan reuters
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला तर…”, भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत माजी RBI गव्हर्नर रघुराम राजन यांचं मोठं वक्तव्य
chhagan bhujbal narendra modi
भाजपाच्या ‘४०० पार’च्या घोषणेचा निवडणुकीत फटका बसला? भुजबळांची जाहीर कबुली; मोदींचा उल्लेख करत म्हणाले…

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार

● १९ एप्रिल रोजी झालेल्या पहिल्या टप्प्यात २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून १०२ जागांसाठी १,६२५ उमेदवार निवडणूक लढवत होते.

● २६ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात १३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील ८९ जागांवर १,१९८ उमेदवार होते. तर ७ मे रोजी तिसऱ्या टप्प्यात १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ९४ जागांवर १,३५२ उमेदवार होते.

● पाचव्या टप्प्यात २० मे रोजी १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ४९ जागांसाठी १,३५२ उमेदवार होते.

● येत्या २५ मे आणि १ जून रोजी होणाऱ्या सहाव्या आणि सातव्या टप्प्यात अनुक्रमे ८६९ आणि ९०४ उमेदवार रिंगणात आहेत.

● सात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ५७ मतदारसंघांमध्ये अनुक्रमे २५ मे आणि १ जून रोजी मतदान होणार आहे.