‘आयसिस’विरुद्ध वक्तव्य केल्याबद्दल ‘एमआयएम’चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांना त्या दहशतवादी संघटनेकडून समाजमाध्यमांवरून धमकी आल्याचे वृत्त आहे. मात्र अशा प्रकारच्या धमक्यांना आपण भीक घालत नाही, असे ओवेसी यांनी म्हटले आहे. जर आपल्याला या संघटनेबाबत काही माहिती नसेल तर ‘आयसिस’विरोधात वक्तव्य करण्यापेक्षा तोंड बंद ठेवणे आपल्यासाठी उत्तम आहे, ‘आयसिस’ लवकरच भारतावर हल्ला करणार आहे, असे ओवेसी यांच्या ट्विटरवर टाकण्यात आले आहे. मात्र आता हे ट्वीट पुसून टाकण्यात आले आहे.भारतावर हल्ला करणार असल्याचे जर कोणी सांगत असेल तर आम्हीही  सडेतोड प्रत्युत्तर देऊ, भारत आमची मातृभूमी आहे, अशा वल्गना सहन केल्या जाणार नाहीत, असे ओवेसी यांनी वार्ताहरांना सांगितले.