काँग्रेसकडून माझ्या खोटा व्हिडिओ प्रसारित करण्यात आला असून भाजपाचा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाला विरोध नाही, असं स्पष्टीकरण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिले आहे. गुवाहाटीमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेसवर सडकून टीकाही केली.

नेमकं काय म्हणाले अमित शाह?

आगामी निवडणुकीत ४०० जागा मिळाल्यानंतर भाजपाकडून आरक्षण रद्द केले जाईल, असा खोटा प्रचार काँग्रेसकडून करण्यात येत आहे. मात्र यात कोणतेही तथ्य नाही. काँग्रेसचा हा दावा पूर्णपणे खोटा आणि निराधार आहे. भाजपाने कधीही अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाचा विरोध केला नाही. भाजपाचा या आरक्षणाला पाठिंबा आहे, अशी प्रतिक्रिया अमित शाह यांनी दिली.

हेही वाचा – Video: “कशाला बदलणार संविधान? काय गरज आहे?” मोदींच्या समोरच उदयनराजे भोसलेंचा थेट सवाल; इंदिरा गांधींचा उल्लेख करत म्हणाले…

भाजपाला मिळत असलेलं यश बघून काँग्रेस पक्ष निराश झाला आहे. त्यामुळे त्यांच्याकडून खालच्या पातळीवरचं राजकारण केलं जात आहे. काँग्रेसचे अनेक नेते भाजपा नेत्यांचे खोटे व्हिडिओ प्रसारित करत आहेत. या कृत्यातून त्यांची निराशा स्पष्टपणे दिसून येते आहे, असेही ते म्हणाले.

पुढे बोलताना त्यांनी राहुल गांधी यांनाही लक्ष्य केलं. राहुल गांधी यांनी जेव्हापासून काँग्रेसची सूत्रे हातात घेतली, तेव्हापासून त्यांच्या राजकारणाचा स्तर खाली जातो आहे. बनावट व्हिडिओ प्रसारित करून ते जनेताचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांचा हा प्रयत्न निषेधार्ह आहे, अशी टीकाही अमित शाह यांनी केली.

हेही वाचा – विरोधी पक्षातील नेत्यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर खटले रद्द होतात का? मोदी म्हणाले, “एकही केस…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी बोलताना त्यांनी अमेठी आणि रायबरेलीमध्ये काँग्रेस उमेदवारांच्या घोषणेला होत असलेल्या विलंबावरही प्रतिक्रिया दिली. अमेठी आणि रायबरेलीत ते निवडणूक लढतील की नाही, हे मला माहिती नाही. मात्र, सध्या काँग्रेसमध्ये आत्मविश्वासाची कमी आहे, असे ते म्हणाले.