गाझीपूर, लखनौ : गँगस्टर व नंतर राजकीय नेता बनलेला मुख्तार अन्सारी याचा दफनविधी गाझीपूरमधील कालीबाग दफनभूमीत रविवारी पार पडला. त्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला होता. अन्सारीचा मृतदेह घरापासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावरील त्याच्या कुटुंबाच्या वंशपरंपरागत दफनभूमीत आणण्यात आला. त्याच्या पालकांच्या थडग्याशेजारी त्याचेही थडगे शुक्रवारी खणण्यात आले होते. प्रशासनाने अन्सारीचे घर व दफनभूमी यांच्या बाहेर व्यापक सुरक्षाव्यवस्था ठेवली होती.

हेही वाचा >>> अरुणाचलमध्ये भाजपचे दहा उमेदवार बिनविरोध; मुख्यमंत्री पेमा खांडू दुसऱ्यांदा बिनविरोध

What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
what Saina Nehwal Said?
“मग मी काय करायला हवं होतं?”, बॅडमिंटन स्टार सायना नेहवालचा ‘त्या’ वक्तव्यावरुन काँग्रेसला थेट प्रश्न
president droupadi murmu presents bharat ratna awards at rashtrapati bhavan
राष्ट्रपतींच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार प्रदान
raj thackray mns latest news
“राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम”, मनसेला गळती; सात शिलेदारांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’

गुरुवारी मरण पावलेल्या अन्सारीचा मृतदेह शुक्रवारी मध्यरात्री बांदा येथून चारशे किलोमीटरवरील त्याच्या गावी आणण्यात आला. शनिवारी त्याच्या वंशपरंपरागत घरातून अंत्ययात्रा निघाली. खासदार असलेला त्याचा मोठा भाऊ अफझल अन्सारी, मुलगा ओमर व पुतण्या आमदार सुहैब अन्सारी याच्यासह कुटुंबीय आणि समर्थक अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. मात्र मुख्तारचा मोठा मुलगा आमदार अब्बास अन्सारी अंत्यविधीत सामील होऊ शकला नाही. तो कासगंज तुरुंगात आहे. पोलिसांनी दफनभूमीत प्रवेशासाठी लोकांच्या संख्येवर मर्यादा घातली होती. अंत्ययात्रेत जमाव प्रचंड संख्येत सहभागी झाला होता आणि त्यापैकी काहींनी घोषणा दिल्या. दफनभूमीत पोहचल्यानंतर अफझल याने जमावाला शांतता राखण्याचे आवाहन केले.