भारत-चीन दरम्यान सोमवारी रात्री सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया सुरू असताना चीनने आगळीक करून भारतीय सैनिकांवर हल्ला केला होता. यात भारतीय लष्कराचे २० जवान शहीद झाले होते, तर चीनचे ४३ सैनिक ठार झाल्याचं वृत्त आहे. या घटनेत वीरमरण आलेल्या जवानांची नावं प्रसिद्ध करण्यात आली आहे.

शहीद झालेल्या जवानांची नाव अशी…

कर्नल बिकुमल्ला संतोष बाबू (हैदराबाद)

नायक सुभेदार नुदुरम सोरेन(मयूरभंज)

नायक सुभेदार मंदीपसिंह (पटियाला)

नायक सुभेदार सतनाम सिंह (गुरूदासपूर)

हवालदार के. पालानी (मदुराई)

हवालदार सुनील कुमार (पटणा)

हवालदार बिपुल राय (मेरठ शहर)

नायक दीपक कुमार (रीवा)

शिपाई राजेश ओरांग (बीरभूम)

शिपाई कुंदन कुमार ओझा (साहेबगंज)

शिपाई गणेश राम (कांकेर)

शिपाई चंद्रकांता प्रधान (कंधमाल)

शिपाई अंकुश (हमीरपूर), शिपाई गुरबिंदर (संगरूर)

शिपाई गुरतेज सिंह (मनसा)

शिपाई चंदन कुमार (भोजपूर)

शिपाई कुंदन कुमार (सहरसा)

शिपाई अमन कुमार (समस्तीपूर)

शिपाई जय किशोर सिंह (वैशाली)

शिपाई गणेश हंसदा (पूर्व सिंहभूम)

या जवानांना चीन सैन्यासोबत झालेल्या संघर्षात वीरमरण आले.

चीनच्या सीमेवर अशा प्रकारे भारतीय जवान शहीद होण्याची अशी घटना १९७५नंतर प्रथमच घडली आहे. त्या वेळी अरुणाचल सीमेवर आसाम रायफल्सचे चार जवान मृत्युमुखी पडले होते. दोन्ही देशांदरम्यान अनेक वर्षांपूर्वी झालेल्या करारानुसार कोणत्याही परिस्थितीत सीमेवरील संघर्षांदरम्यान बंदुका न चालवण्याविषयी खबरदारी घेतली जाते.