आशियातील कांद्याची सर्वात मोठी किरकोळ विक्री बाजारपेठ असलेल्या लासलगाव येथे कांदा ४० रू. किलो झाला असून काही महिन्यांपूर्वी कांद्याचा भाव वीस रूपये किलो होता, तो आता दुप्पट आहे.नॅशनल हॉर्टिकल्चरल रीसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या मते कांद्याचे भाव वर्षभरापूर्वी वीस रूपये किलो होते, ते आता ४० रूपये किलो झाले आहेत. कांद्याचे भाव आणखी वाढण्याची शक्यता असून शेतकरी व व्यापारी साठा बाळगून आहेत व ते कमी कांदा विक्रीस आणीत आहेत. गेल्या वर्षी कांद्याची मंडईतील आवक दिवसाला १५ ते १८ हजार क्विंटल होती ती आता ५ ते ६ हजार क्विंटल आहे.