केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी पाकव्याप्त काश्मीरमधील निदर्शनांचा उल्लेख केला. पाकव्याप्त काश्मीर भारताचाच भाग आहे आणि आम्ही तो लवकरच घेऊ, असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला. पश्चिम बंगालमधील सेरामपूर येथील सभेला संबोधित करताना गृहमंत्री म्हणाले, २०१९ मध्ये अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर एकेकाळी संकटग्रस्त असलेल्या काश्मीरमध्ये शांतता परत आली आहे, तर पाकव्याप्त काश्मीर आता स्वातंत्र्य आणि निषेधाच्या घोषणांनी गुंजत आहे. पूर्वी काश्मीरमध्ये स्वातंत्र्याच्या घोषणा व्हायच्या, त्याच घोषणा आता पाकव्याप्त काश्मीरमध्ये होत आहेत, असे शहा म्हणाले.

पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याच्या मागणीला पाठिंबा न दिल्याबद्दल काँग्रेस नेत्यांवर शहा यांनी टीका केली. ‘‘काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांच्यासारखे काँग्रेस नेते म्हणतात की त्यांच्याकडे अणुबॉम्ब असल्याने असे करू नये. पण मला सांगायचे आहे की पाकव्याप्त काश्मीर भारताचाच भाग आहे आणि तो आम्ही घेऊ,’’ असे ते म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan occupied kashmir will soon part of india says hm amit shah zws
First published on: 16-05-2024 at 05:30 IST