हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानने फाशीची शिक्षा ठोठावलेले भारतातील माजी नौदल अधिकारी कुलभूषण यांच्याबाबत भारतासमवेत कोणताही करार करण्यात आला नसल्याचे गुरुवारी पाकिस्तानने स्पष्ट केले.

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात कोणतेही पाऊल उचलण्याचा निर्णय घेण्यात आला तर तो आपल्या घटनेनुसारच घेण्यात येईल, असेही पाकिस्तानने म्हटले आहे.

जाधव यांच्या प्रकरणाचा फेरआढावा घेण्यासाठी सरकार विविध कायदेशीर पर्याय तपासून पाहात असल्याचे पाकिस्तानच्या लष्कराने म्हटले होते. त्यानंतर पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ते मोहम्मद फैझल यांनी वरील बाब स्पष्ट केली आहे.

जाधव यांच्याबाबत कोणताही करार करण्यात येणार नाही, सर्व निर्णय स्थानिक कायद्यानुसार घेण्यात येतील असे फैझल यांनी येथे माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले.