बीजिंग : बीजिंगमध्ये पीपल्स काँग्रेसचे ४,८९८ जिल्हास्तरीय उपाध्यक्ष आणि शहर स्तरावरील ११,१३७ उपाध्यक्ष निवडण्यासाठी शुक्रवारी मतदान घेण्यात आले. या निवडणुकीत अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी बीजिंगमधील ह्युएरेंटांग (झोंगनानहाय निवडणूक जिल्हा) मतदान केंद्रावर मतदान केले. चीनमधील सत्तारूढ कम्युनिस्ट पक्ष आपण लोकशाहीवादी असल्याची प्रतिमा उभी करीत आहे. लोकशाही व्यवस्था ही काही विशिष्ट देशांची मक्तेदारी नाही, असे चिनी कम्युनिस्ट पक्षान म्हटले आहे.  ८६ वर्षीय क्षी यांनी यावेळी सर्वांगीण लोकशाही विकसित करून मतदान पद्धती मजबूत करण्यावर भर दिला, असे चीनच्या शासकीय झिन्युहा वृत्तसंस्थेने म्हटले आहे. हा देश लोक चालवितात, हे या निवडणुकीतून स्पष्ट होते. निवडणूक पद्धती एकात्मिक असावी आणि त्यातून लोकांचे समाधान साधले जावे, असेही चिनी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस असलेले क्षी यांनी म्हटले आहे. क्षी यांच्यासह पक्षातील अन्य नेते आणि पंतप्रधान ली केक्वींग यांनीही मतदान केले.