पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: झोपत नाहीत व मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनाही अविश्रांत काम करायला लावतात, अशा शब्दांत केंद्रीय नगरविकासमंत्री वेंकय्या नायडू यांनी मोदींच्या कार्यशैलीचे कौतुक केले. जनतेसाठी काम करत असल्याने आमची याबाबत तक्रार नाही, असे नायडूंनी एका कार्यक्रमात स्पष्ट केले.
प्रत्येक नागरिकाचे बँक खाते होण्यासाठी पाच वर्षांचे उद्दिष्ट गरजेचे असल्याचे मंत्रिमंडळातील काही सहकारी सांगतात. मोदींना मात्र हे वर्षभरात पूर्ण व्हावे असे वाटते. त्यावरून त्यांच्या अपेक्षा ध्यानात येतील. प्रधानमंत्री जनधन योजना सुरू होऊन सात आठवडे झाले. आतापर्यंत ६.९९ कोटी नागरिकांनी बँक खाती उघडल्याचे नायडूंनी स्पष्ट केले.