scorecardresearch

Premium

“कलम ३७० रद्द करणे योग्यच”, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

SC Verdict on Article 370 : कलम ३७० प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Pm Narendra Modi
सर्वोच्च न्यायालय सुनावणी कलम ३७० (संग्रहित छायाचित्र)

Jammu and Kashmir Latest News Today : “तत्कालीन युद्धजन्य स्थितीमुळे जम्मू काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द करण्यात आले. ही तात्पुरत्या स्वरुपाची व्यवस्था आहे. कागदपत्रांमध्येही त्यासंदर्भातला उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे कलम ३७० रद्द करणं योग्यच होतं”, असं आज सर्वोच्च न्यायालयाने नमूद केलं. जम्मू काश्मीरमध्ये कल ३७० रद्द केल्याने याविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. याप्रकरणी सप्टेंबर महिन्यात सुनावणी झाली होती. त्यावेळी या निर्णयाचा निकाल राखून ठेवला होता. हा निकाल आज ११ डिसेंबर रोजी सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी वाचून दाखवला. हा निकाल आल्यानंतर भाजपा आणि केंद्रातील अनेक मंत्र्यांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट करत जम्मू काश्मीरमधील जनतेला आश्वासित केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, कलम ३७० रद्द करण्याबाबतचा आजचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल ऐतिहासिक आहे. या निकालामुळे भारतीय संसदेने ५ ऑगस्ट २०१९ रोजी घेतलेला निर्णय घटनात्मकदृष्ट्या वैध ठरला आहे. जम्मू, काश्मीर आणि लडाखमधील नागरिकांसाठी ही आशा, प्रगती आणि एकतेची घोषणा आहे. न्यायालयाने या निकालामुळे एकतेचे मूलतत्त्व दृढ केले आहे. ज्याचा भारतीय आदर करतात.

Nitish Kumar New cm of bihar
नवव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नितीश कुमारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मी जिथं होतो…”
jaylalita tn
…जेव्हा जयललिता यांनी दागिने न घालण्याचा केला होता संकल्प; जे. जयललिता यांच्या दगिन्यांचा २५ वर्षांचा इतिहास
Narendra Modi in Ayodhya
“अयोध्येत जाणं टाळा”, पंतप्रधान नरेंद्र मोदींची केंद्रीय मंत्र्यांना सूचना; नेमकं कारण काय?
Four sentenced to life imprisonment in connection with the murder of developer
डोंबिवली जवळील विकासकाच्या हत्येप्रकरणी चार जणांना जन्मठेप

हेही वाचा >> Article 370 Verdict: मोठी बातमी! “कलम ३७० रद्द करणं योग्यच”, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; वाचा नेमकं काय म्हटलंय निकालपत्रात…

“मी जम्मू, काश्मीर आणि लडाखच्या संयमी लोकांना हे आश्वासन देऊ इच्छितो की तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. कलम ३७० रद्द केल्यामुळे समाजातील सर्वात असुरक्षित आणि उपेक्षित घटकांपर्यंत सरकारी लाभ पोहोचवण्याचा आमचा निर्धार आहे”, असंही मोदी म्हणाले.

“आजचा निकाल हा केवळ कायदेशीर निकाल नाही; हा आशेचा किरण आहे, उज्वल भविष्याचे वचन आहे आणि एक मजबूत, अधिक अखंड भारत निर्माण करण्याच्या आपल्या सामूहिक संकल्पाचा दाखला आहे, असंही ते म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाने नेमकं काय म्हटलं?

सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात असं स्पष्ट केलंय की जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम ३७० हे राज्यघटनेमध्ये तात्पुरत्या स्वरुपात होतं. “तत्कालीन युद्धजन्य स्थितीमुळे करण्यात आलेली ती तात्पुरत्या स्वरुपाची व्यवस्था होती. कागदपत्रांमध्येही त्यासंदर्भातला उल्लेख करण्यात आला आहे”, असं सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी निकालात नमूद केलं आहे.

हेही वाचा >> Article 370 Verdict : “जम्मू काश्मीरमध्ये सप्टेंबर २०२४ पर्यंत विधानसभा निवडणुका घ्या”, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

सप्टेंबरपर्यंत निवडणुका घेण्याचे आदेश

सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालपत्रात निवडणूक आयोगाला जम्मू-काश्मीरमध्ये लवकरात लवकर विधानसभेच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. “जम्मू-काश्मीर विधानसभेसाठी ३० सप्टेंबरपूर्वी (२०२४) निवडणुका घेतल्या जाव्यात. जम्मू-काश्मीरचा राज्य दर्जा लवकरात लवकर प्रस्थापित व्हायला हवा”, असं सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी आपल्या निकालपत्रात नमूद केलं आहे.

एका झटक्यात हे घडलं असं नाही – सर्वोच्च न्यायालय

काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द करून भारतीय राज्यघटनेतील सर्व तत्वे लागू करण्याची प्रक्रिया अचानक एका झटक्यात झालेली नसल्याचं न्यायालयाने यावेळी स्पष्ट केली. “इतिहासातून हे दिसून आलं आहे की जम्मू-काश्मीर टप्प्याटप्प्याने घटनात्मक अंतर्भाव करण्याची प्रक्रिया होत नव्हती. हे असं काही नाही की ७० वर्षांनंतर अचानक देशाची राज्यघटना काश्मीरमध्ये लागू झाली. ही हळूहळू झालेली प्रक्रिया आहे. त्यामुळे आम्ही हे स्पष्ट करतो की राज्यघटनेची सर्व तत्वे व कलम जम्मू-काश्मीरमध्ये लागू केले जाऊ शकतात”, असं सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी नमूद केलं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pm narendra modi post on supreme court verdict on article 370 sgk

First published on: 11-12-2023 at 13:42 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×