संजय बापट, लोकसत्ता

सुलतानपूर (उत्तर प्रदेश) :  वर्षांनुवर्षे उत्तर प्रदेशात राज्य करणाऱ्या काँग्रेस- समाजवादी पक्षांनी घराणेशाहीच्या नादात राज्याच्या सर्वागिण विकासाकडे दुर्लक्ष के ले. एकीकडे माफियाराज तर दुसरीकडे लोकांना गरीबीच्या खाईत लोटले.  त्यामुळे राज्यातील विकास खुंटला होता. केंद्रा सरकारने प्रयत्न करूनही राज्य सरकारने साथ दिली नाही. मात्र गेल्या साडेचार वर्षांत या राज्याचा चेहरामोहरा बदलत असून स्वातंत्र्यानंतर प्रथमच या राज्यात विकासाचे स्वप्न साकार होताना दिसत आहे. त्यामुळे केवळ देशाचाच नव्हे तर जगाचाही या राज्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन आता बदलल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी येथे के ला.

उत्तर प्रदेश सरकारने विकासापासून कोसो दूर असलेल्या पूर्वाचल भागास थेट राज्याच्या तसेच  देशाच्या राजधानीशी जोडण्यासाठी सुमारे २२ हजार ५०० कोटी रूपये खर्चून बांधलेल्या ३४१ किलोमीटर लांबीच्या सहा पदरी लखनऊ – सुलतानपूर-गाजीपूर  ‘पूर्वाचल एक्सप्रेस वे’ अर्थात  द्रुतगती महार्गाच्या लोकार्पण सोहळ्यात मोदी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, खासदार मनेका गांधी आदी मान्यवर उपस्थित होते.  या वेळी मोदी यांनी आगामी उत्तर प्रदेश सार्वत्रिक निवडणुकीचे रणशिंग फुंकताना या राज्याला आजवर विकासापासून वंचित ठेवणाऱ्या विरोधी पक्षांना कायमच सत्तेपासून दूर ठेवण्याचे आवाहन के ले.

देशाच्या संतुलीत विकासासाठी सर्व राज्यांचा समान विकास होणे गरजेचे असताना पूर्वेकडील राज्ये मात्र आजवर विकासापासून वंचित राहिली आहेत. उत्तर प्रदेशातील पूर्वाचल भागही असाच विकासपासून वंचित राहिला असून द्रुतगती महामार्गामुळे या भागात विकासाला चालना मिळणार आहे. तसेच या महामार्गावर हवाई दलाची विमाने आपत्तकालीन परिस्थितीत उतरण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या ३.४ किमी लांबीच्या आणि ३४ मीटर  रुंदीच्या धावपट्टीमुळे हवाई दलास मोठी मदत होणार असल्याचे प्रारंभीच स्पष्ट करून मोदी यांनी गेल्या साडेचार वर्षांत राज्यात योगी सरकारने के लेल्या विकास कामांचा लेखाजोखा मांडला. सात-आठ वर्षांपूर्वी या राज्यातील परिस्थिती पाहून हैराण होतो.  या राज्यातील खासदार आणि पंतप्रधान म्हणून उत्तर प्रदेशाच्या विकासाठी प्रयत्न करतानाही तत्कालीन राज्य सरकारने साथ दिली नाही. उलट मतपेढी दूर जाण्याच्या भितीने मुख्यमंत्री विमानतळावर स्वागत करून गायब होत. त्यावेळच्या सरकारांनी विकासात भेदभाव के ला. दिल्ली आणि राज्यातील सरकारांनी आपल्या परिवाराचेच हित साधले असा आरोपही मोदी यांनी काँग्रेस- समाजवादी पक्षावर के ला.

तसेच गेल्या साडे चार वर्षांत राज्यात मोठय़ा प्रमाणात पायाभूत सुविधा आणि विकास कामे होत असल्याचे सांगितले. पूर्वाचल महामार्गासोबतच बुंदेलखंड, गोरखपूर, गंगा एक्पेस वे अशा महामार्गामुळे राज्यातील सर्व जिल्हे परस्परांशी जोडले जात असून दिल्लीही जोडली जात आहेत. पूर्वाचल महार्गावर २१ ठिकाणी औद्योगिक वसाहती निर्माण केल्या जाणार असून त्यामुळे राज्यात गुंतवणूक आणि रोजगारच्या संधी निर्माण होतील, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त के ला. तर पूर्वांचल एक्सप्रेस पूर्व उत्तर प्रदेशाची जीवनरेखा बनेल असा विश्वास मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त के ला. कोणताही जाती- धर्माचा भेदभाव न करता सरकार विकास योजना लोकांपर्यंत पोहोचवत असून हा महामार्ग केवळ ३६ महिन्यात पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात नवीन ११ विमानतळ विकसित केले जात असून चार शहरांमध्ये मेट्रोचे जाळे निर्माण के ले जात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हवाईदलाच्या हरक्युलिस सी-१३०जे विमानाने कार्यक्रमस्थळी पूर्वांचल महागार्मावर निर्माण करण्यात आलेल्या हवाई पट्टीवर आमगम होताच टाळ्यांचा कडकडाट आणि घोषणाबाजीत स्वागत करण्यात आले. तसेच यावेळी हवाईदलाच्या मिराज २०००, जाग्वार, सुखोई आदी विमानांनी या धावपट्टीवर उतरूण तसेच प्रात्यक्षिक दाखवत देशाच्या संरक्षण  सामर्थ्यांचे प्रदर्शन केले.

महामार्गावरील तिसरी धावपट्टी.. युध्दप्रसंगी शत्रूचे लक्ष्य नेहमी हवाई दलाच्या धावपटटया असतात. तसेच नैसर्गिक आपत्तीच्या काळातही हवाई दलास मदतीसाठी धावपट्टीची गरज असते. या दोन्ही गोष्टींचा विचार करून हवाई दलाच्या मदतीसाठी आणि देशाचे संरक्षण सामर्थ्य अधिक वाढविण्यासाठी महामार्गावर धावपट्टी निर्माण करण्याचे धोरण केंद्रा सरकारने  स्वीकारले आहे. त्यानुसार पूर्वाचल एक्सप्रेस वे वर हवाईदलाच्या विमानांसाठी विशेष धावपट्टी तयार करण्यात आली आहे. देशात यापूर्वीही आपत्तकालीन परिस्थितीसाठी नोयडा- आग्रा  आणि आग्रा- लखनऊ द्रुतगती महामार्गावर अशाच प्रकारे धावपट्टय़ा तयार करण्यात आल्या आहेत.