पंतप्रधान मोदी यांनी नियम बदलवून कोणताही अनुभव नसणाऱ्या अदाणी समुहाला देशातील सहा विमानतळांची मालकी दिली, असा गंभीर आरोप काँग्रेस नेते तथा खासदर राहुल गांधी यांना केला आहे. संसदेत आज राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर बोलताना त्यांनी हे आरोप केले. दरम्यान यावरून भाजपाने आक्षेप घेतल्याने सभागृहात गोंधळ झाल्याचंही बघायला मिळालं.

हेही वाचा- अग्निवीर योजनेबाबत राहुल गांधींचा खळबळजनक आरोप; म्हणाले, “अजित डोभाल यांनी सैन्यावर…”

HM Shri Amit Shah Public Meeting in Akola
“संविधान बदलणार नाही,” अमित शाह यांचा पुनरुच्चार; म्हणाले, “एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण”
devendra fadnavis reaction on Firing at Salman Khan galaxy apartment in mumbai
सलमान खानच्या घरावर गोळीबार, फडणवीस म्हणाले “विरोधकांनी…”
narayan rane On uddhav thackeray
“आम्ही मातोश्रीवर भेट द्यायचो तेव्हा प्रसाद घेऊन जावा लागायचा, मग तो काळा पैसा नव्हता का?”; नारायण राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
Sharad Pawar
कच्चथिवू बेटावरून शरद पवारांचा मोदींवर पलटवार, म्हणाले, “हयात नसलेल्या इंदिरा गांधींवर…”

काय म्हणाले राहुल गांधी?

“काही वर्षांपूर्वी मोदी सरकारने भारतातील विमानतळाचा विकास करण्यासाठी खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला. नियमाप्रमाणे कोणत्याही कंपनीला जर विमानतळ चालवण्याचा अनुभव नसेल तर त्याला विमानतळाची मालकी देता येत नाही, असतानाही अदाणी समुहाला देशातील सहा विमानतळांची मालकी देण्यात आहे. यामध्ये मुंबईसारख्या महत्त्वाच्या विमानतळाचाही समावेश होता. अदाणी समुहासाठी मोदी सरकारने नियम बदलले”, अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली.

हेही वाचा – “राष्ट्रपतींच्या अभिभाषणात बेरोजगारी आणि महागाई हे…” लोकसभेत राहुल गांधी आक्रमक

“मोदी सरकारने नियम बदलल्यानंतर भारतातील सर्वात महत्त्वाचे असलेले मुंबई विमानतळ जीव्हीके कंपनीकडून घेऊन अडाणींना दिले. यासाठी मोदी सरकारने ईडी, सीबीआय सारख्या तपास संस्थांचा वापर करत जीव्हीके कंपनीवर दबाव आणला”, असा आरोपही त्यांनी केला.

हेही वाचा – अग्निवीर योजनेबाबत राहुल गांधींचा खळबळजनक आरोप; म्हणाले, “अजित डोभाल यांनी सैन्यावर…”

पुढे बोलताना, “अदाणींना सुरक्षा क्षेत्रातला काहीही अनुभव नव्हता. मात्र ते ड्रोन्स तयार करतात जे लष्कर, नौदल आणि हवाईदलासाठी वापरले जातात. एचएलच्या माध्यमातून हे काम अदाणींना दिलं गेलं. पंतप्रधान इस्रायलला जातात आणि त्यानंतर अदाणींना काम मिळालं. जे एअरपोर्ट्सच्या बाबत झालं तेच याबाबत झालं. कुठलाही अनुभव नसताना हे काम अदाणींना देण्यात आलं”, असेही ते म्हणाले.