scorecardresearch

Premium

योगासने, मॉर्निग वॉक अन् आमटी-भात, अडकलेल्या मजुरांनी जागवल्या आठवणी

दररोज थोडा वेळ योगासने, सकाळी तसेच जेवण झाल्यावर चालणे याच्या मदतीने बोगद्यात १७ दिवस अडकून पडलेल्या मजुरांनी आपले मानसिक आणि शारिरीक स्वास्थ्य चांगले ठेवले.

Rescue of trapped laborers in Uttarakhand
योगासने, मॉर्निग वॉक अन् आमटी-भात, अडकलेल्या मजुरांनी जागवल्या आठवणी ( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता

पीटीआय, नवी दिल्ली

दररोज थोडा वेळ योगासने, सकाळी तसेच जेवण झाल्यावर चालणे याच्या मदतीने बोगद्यात १७ दिवस अडकून पडलेल्या मजुरांनी आपले मानसिक आणि शारिरीक स्वास्थ्य चांगले ठेवले. सुटका झाल्याच्या दुसऱ्या दिवशी, बुधवारी या मजुरांनी बोगद्यातील परिस्थिती विषद केली. बोगद्याचा भाग कोसळला तो क्षण आणि नंतरचे पहिले ७० तास सर्वात आव्हानात्मक आणि कसोटी पाहणारे असल्याचे या मजुरांनी सांगितले.

pune dhankawadi businessman suicide marathi news
पुणे : पैसे परत करण्यासाठी तगादा लावल्याने तरुणाची आत्महत्या
two person murder senior
वरिष्ठाने ‘बॉसगिरी’ करून नोकरीवरून काढण्याची धमकी दिली, चिडलेल्या दोघांनी…
illegal abortion pune marathi news, illegal abortion of a young girl pune marathi news,
पुणे : तरुणीचा बेकायदा गर्भपात, डॉक्टर दाम्पत्यासह सहाजणांविरुद्ध पोलिसांची कारवाई; धरणात फेकून देण्याची तरुणीला धमकी
man stole 111 bikes for household expenses after love marriage
नागपूर : प्रेमविवाह केल्यानंतर आर्थिक अडचणी वाढल्या; खर्च भागवण्यासाठी प्रेमविराने तब्बल १११ दुचाकी चोरल्या

उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात चारधाम यात्रेच्या मार्गावरील सिलक्यारी येथे निर्माणाधीन बोगद्याचा काही भाग कोसळल्याने तब्बल ४१ मजूर अडकून पडले होते. त्यानंतरचे १७ दिवस बोगद्याच्या आतमधील दोन किलोमीटरचा भाग हेच या मजुरांचे विश्व होते. २५ वर्षांच्या मनजित चौहान हा मजुर बोगदा कोसळला त्या प्रसंगाचे वर्णन करताना म्हणाला, ‘‘ढिगारा कोसळला तिथून मी केवळ १५ मीटर अंतरावर होतो. सुरूवातीला वाटले की मी स्वप्न बघत आहे आणि ते दुस्वप्न ठरलेच.. आम्ही सर्वजण घाबरलो होतो. उपासमार, घुसमट असे सगळे विचार मनात आले. सर्वजण हेच बोलत होते.’’ अन्य एका मजुराने सांगितले, की पहिले काही तास अत्यंत कठीण गेल्यानंतर बाहेरून गरमागरम आमटी-भात, पाण्याच्या बाटल्या आतमध्ये पाठविण्यात आल्यानंतर जिवात जीव आला.

हेही वाचा >>>पाकिस्तानात जाऊन फेसबुक मित्रासोबत लग्न करणारी ‘अंजू’ भारतात परतली; भारतीय सीमेत येताच…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरध्वनीद्वारे काही मजुरांशी संवाद साधला. यावेळी तब्येत चांगली ठेवण्यासाठी योगासने व मॉर्निग वॉकची मदत झाल्याचे बिहारच्या साबा अहमद याने पंतप्रधानांना सांगितले. या १७ दिवसांच्या काळात सर्व मजूर एकमेकांचे चांगले मित्र झाल्याचाही उल्लेख अहमदने केला. उत्तराखंडच्या गब्बरसिंह नेगी याने पंतप्रधान मोदी, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी, कंत्राटदार कंपनी तसेच बचाव पथकांचे आभार मानले.

डोंगरातील पाणी, पोह्यांवर भिस्त

बोगद्याचा भाग कोसळल्यानंतर पहिले ७० तास सर्वात कठीण गेल्याचे २२ वर्षिय अनिल बेडिया या मजुराने सांगितले. तहान भागविण्यासाठी डोंगरातून झिरपणारे पाणी पिण्याचा सल्ला दोन वरिष्ठांनी दिल्याचे तो म्हणाला. या काळात जवळ असलेल्या पोह्यांवर भिस्त होती. मात्र नंतर बाहेरून मदत येण्यास सुरूवात झाली व धीर मिळाल्याचे अनिलने नमूद केले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rescue of trapped laborers in uttarakhand amy

First published on: 30-11-2023 at 02:04 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×