भारतीय वंशाचे संशोधक व युनिव्हर्सिटी स्टर्न स्कूल ऑफ बिझीनेसचे प्राध्यापक श्रीकांत जगबाथुला यांना नॅशनल सायन्स फाउंडेशनचा पाच लाख डॉलरचा पुरस्कार जाहीर झाला आहे. आयआयटी मुंबईचे माजी विद्यार्थी असलेले जगबाथुला यांनी संचालनात्मक निर्णय प्रक्रियेतील अचूकतेबाबत माहितीवर आधारित प्रारूपे शोधली आहेत.
फॅकल्टी अर्ली करियर डेव्हलपमेंट प्रोग्रॅम स्पर्धात्मक असून त्यात वेगळ्या संशोधनासाठी सन्मान केला जातो. शिक्षण व संशोधन यांची सांगड घालण्याचा उद्देश आहे. जगबाथुला यांच्या संशोधनाचा आपल्याला अभिमान आहे, असे एनवाययू स्टेमचे अधिष्ठाता पीटर हेन्री यांनी सांगितले.