रशियाने युक्रेनवर हल्ला केल्याच्या पहिल्याच दिवशी युक्रेनच्या ताब्यातील स्नेक बेटावरील संघर्षामध्ये १३ युक्रेनियन सैनिक शहीद झाल्याचं वृत्त युक्रेन नौदलाने फेटाळून लावलंय. हे सैनिक जिवंत असल्याची माहिती नौदलाने दिलीय. बॉर्डर गार्ड म्हणून या छोट्याश्या बेटावर तैनात असणाऱ्या १३ सैनिकांना मृत्यूनंतर योग्य तो सन्मान दिला जाईल असं युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी भाषणात म्हटलं होतं. या सैनिकांनी रशियन नौदलाच्या जहाजाला नरकात जा असं सांगितल्याचं ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये आढळून आलेलं.

युक्रेनचं म्हणणं काय?
रशियाने या बेटावरील सैनिक शरण आल्याचे म्हटलंय. युक्रेन नौदलाच्या फेसबुक पोस्टमध्ये, “आमचे सहकारी आमच्या सोबत असून ते सुरक्षित आहेत.” आमच्या या सहकाऱ्यांनी दोन वेळा रशियन नौदलाला यशस्वीपणे टक्कर दिली. मात्र नंतर दारुगोळा संपल्याने त्यांना संघर्ष करता आला नाही, असं युक्रेन नौदलाने स्पष्ट केलंय. रशियन नौदलाने या बेटावरील सर्व बांधकाम उद्धवस्त केलंय. यामध्ये दीपस्तंभ, इमारती, संदेश वहनसाठी वापरले जाणारे टॉवर आणि इतर सर्व यंत्रणा रशियन फौजांकडून नष्ट करण्यात आलीय.

Why has the government banned 23 dangerous dogs in the country
पिटबुल, रोटवायलर, अमेरिकन बुलडॉग… देशात २३ ‘धोकादायक’ श्वानांवर सरकारकडून बंदी का? श्वानप्रेमींचे बंदीविरुद्ध आक्षेप कोणते?
Ukraine Russia war takes a new turn
युक्रेन-रशिया युद्धाला नवे वळण; अमेरिकेच्या क्षेपणास्त्रांनी रशियाच्या लष्करी तळांवर हल्ले
IRGC behind Israel attack
इस्रायलच्या हल्ल्यामागे कुणाचा हात? ज्यू राष्ट्रावर हल्ला करणारी इस्लामिक संघटना कोणती?
Iran Israel Attack Live Updates in Marathi
Iran Attack Israel : “आमच्यावर कोणी हल्ला करत असेल तर….”, भारतातील इस्रायलच्या राजदूतांनी दिला इशारा

रशियाचं म्हणणं काय?
रशियन संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार स्नेक बेटावरील ८२ युक्रेनियन सैनिकांनी शरण येण्याचा निर्णय घेत शस्त्र टाकली. मात्र यावेळी नौदलाच्या जहाजांनी बेटावरील बांधकाम उध्धवस्त केलं की नाही याबद्दलची माहिती दिली नाही.

बेट नक्की कुठे आहे?
युक्रेनच्या मुख्य भूभागापासून ४८ किलोमीटरवर स्नेक बेट आहे. या बेटाचा आकार फारच छोटा म्हणजे १८ हेक्टर्स इतका आहे. असं असलं तरी लष्करी दृष्ट्या या बेटाला फार महत्व आहे.

नेमकं घडलं काय?
रशियन युद्धनौका आणि या युक्रेनच्या सैनिकांदरम्यान झालेल्या संवादामध्ये रशियन नौदलाच्या जहाजाने या बेटावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यापूर्वी त्यांनी उद्घोषणा करुन या सैनिकांना शरण या असं आवाहन केलं. शरण या नाहीतर उगाच रक्तपात होईल असा धमकी वजा इशारा रशियन युद्धनौकेवरुन देण्यात आल्याचं सांगितलं गेलं. मात्र रशियन नौदलाचं भलं मोठं जहाज समोर असताना या युक्रेनच्या सैनिकांनी शरण न येण्याचा निर्णय घेतला. त्यांनी उलट शिवीगाळ करत या जहाजाला निघून जाण्यास सांगितलं. “रशियन युद्धनौकांनी इथून निघून जावं. F*** O**” असं उत्तर या सैनिकांनी दिलं. हाच संदेश ऑडिओ म्हणून रेकॉर्ड झाला आणि नंतर या सैनिकांशी काहीच संपर्क होऊ न शकल्याने ते शहिद झाल्याचं समजलं गेलं. मात्र संपर्क यंत्रणा उद्धवस्त झाल्याने संपर्क होत नव्हता हे आता स्पष्ट झालं असून दोन वेळा संघर्ष केल्यानंतर हे सैनिक शरण आल्याची माहिती समोर येतेय.