Heinrich Klassen Mobbed SRH fans in Hyderabad Mall Video: सनरायझर्स हैदराबादचा संघ यंदा तुफान फॉर्मात आहे. विविध विक्रमांची आपल्या नावे नोंद करत सर्वच खेळाडू आपली जबाबदारी पार पाडत आहेत. याचदरम्यान हैदराबाद संघाचा विस्फोटक फलंदाज हेनरिक क्लासेनला हैदराबादमधील चाहत्यांनी घेरलं, हैदराबादच्या एका मॉलमधील हा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. त्यावेळेस क्लासेनसोबत जयदेव उनाडकटही तिथे उपस्थित होता. क्लासेन मात्र चाहत्यांचं वागणं पाहून चांगलाच भडकला.

हेनरिक क्लासेन हैदराबादमधील मॉलमधील संघातील खेळाडूंसोबत गेला होता. त्याला पाहताच SRH चाहत्यांनी गर्दी केली. क्लासेनसोबत जयदेव उनाडकटही होता. चाहत्यांनी गर्दी तर केली होतीच पण सोबतच त्यांच्या नावाचा जयघोषही सुरू होता. अशा गर्दीची सवय नसल्याने क्लासेन खूपच अस्वस्थ दिसला. गर्दी इतकी नियंत्रणाबाहेर गेली की अक्षरश सेल्फी आणि फोटोसाठी धक्काबुक्की सुरू होती. क्लासेन या गर्दीत अडकला होता आणि चारही बाजूंनी चाहत्यांनी त्याला घेरले होते.

who is sanjay verma
राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्त करण्यात आलेले संजय वर्मा कोण आहेत? जाणून घ्या…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Jodhapur Ward Boy Viral Video
धक्कादायक! टेक्निशियन रजेवर असल्याने वॉर्डबॉयकडून ईसीजी चाचणी; कुटुंबीयांनी अडवताच म्हणाला…, पाहा VIDEO
saras baug pune diwali pahat
“आमच्याकडे सारसबाग आहे!”; काकांचा डान्स अन् तरुणांचा धिंगाणा, पुण्यातील दिवाळी पहाटचा हा व्हिडीओ पाहिलात का?
Ward Boy Performs ECG Jodhpur :
Jodhpur : धक्कादायक! यूट्यूबवर व्हिडीओ पाहून केला रुग्णाचा ‘ईसीजी’; व्हिडीओ व्हायरल, कुठे घडली घटना?
hindu temple attacked in canada (1)
Video: “कॅनडात हिंदूंवर झालेला हा हल्ला म्हणजे…”, अमेरिकन संसदेतील मराठमोळे सदस्य श्री ठाणेदार यांचं परखड भाष्य!
Bigg Boss Marathi 5 fame Nikki Tamboli was called vahini by paparazzi video viral
Video: ‘वहिनी’ हाक मारताच लाजली निक्की तांबोळी, अरबाज पटेलबरोबरचा ‘तो’ व्हिडीओ होतोय व्हायरल
Video : सायकलवरील ताबा सुटल्याने तरूणाचा मृत्यू

चारही बाजूंनी घेरलेल्या गर्दीवर हेनरिक भडकला

हैदराबादमधील हेनरिक क्लासेनसोबत घडलेल्या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये त्याच्या चेहऱ्यावरील राग स्पष्टपणे दिसत होता. हेनरिक क्लासेन चाहत्यांना शांत होण्याचे आवाहन करतानाही दिसला. पण त्याचं कुणीही ऐकत नव्हतं आणि चाहते त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी सरसावत होते. क्लासेन अखेरीस चाहत्यांवर भडकला आणि पुढे जाताना दिसला.

हेनरिक क्लासेन हा यंदाच्या मोसमात हैदराबादसाठी सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू आहे. क्लासेनने १० सामन्यात १८९.३२ च्या स्ट्राईक रेटने ३३७ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये ३ अर्धशतकांचा समावेश आहे. हैदराबाद संघाने या स्पर्धेत आतापर्यंत १० सामने खेळले आहेत. त्यापैकी ६ सामन्यात विजय, तर ४ सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. यामुळे संघ १२ गुणांसह टॉप-४ मध्ये आहे.