Premium

सुखदेव सिंह गोगामेडींच्या पत्नीचा गंभीर आरोप, “अशोक गेहलोत आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पत्र लिहिलं पण…”

करणी सेनेचे प्रमुख सुखदेव सिंह गोगामेडी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यानंतर आता त्यांच्या पत्नीने गंभीर आरोप केला आहे.

What Sukhdev sing Gogamedi Wife Said?
सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या पत्नीचा गंभीर आरोप (गोगामेडी यांचे संग्रहित छायाचित्र)

जयपूरमध्ये करणी सेनेचे प्रमुख सुखदेव सिंह गोगामेडी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. यानंतर त्यांच्या पत्नीने आता हा आरोप केला आहे की राजस्थानचे तेव्हाचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि राज्य पोलीस प्रमुख यांना काहीवेळा पत्र लिहून सुरक्षा मागितली होती मात्र गोगामेडी यांना सुरक्षा पुरवली गेली नाही. गोगामेडी यांच्या जिवाला धोका आहे, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ते सामाजिक काम करत आहेत त्यामुळे धमक्या आल्या आहेत असं पत्रात लिहिलं होतं तरीही याकडे डोळेझाक केली गेली असा आरोप गोगामेडी यांच्या पत्नी शीला शेखावत यांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुखदेव गोगामेडी यांच्या हत्येनंतर जयपूरमध्ये तणावाचं वातावरण आहे. यानंतर जो FIR दाखल करण्यात आला त्यामध्ये शीला शेखावत यांनी असा दावा केला आहे की पंजाब पोलिसांनी फेब्रुवारी महिन्यात राजस्थानचे पोलीस महासंचालक उमेश मिश्रा यांना करणी सेनेचे अध्यक्ष गोगामेडी यांच्या हत्येच्या कटाबाबत पत्र लिहून माहिती दिली होती. तसंच याची माहिती जयपूर ‘अँटी टेरर स्क्वाड’लाही देण्यात आली होती. माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना आणि उमेश मिश्रा या दोघांनाही गोगामेडी यांच्या जिवाला धोका आहे याची कल्पना होती तरीही त्यांनी सुरक्षा पुरवली नाही.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sukhdev singh gogamedi wife sheela shekhawat alleges i wrote letter to ashok gehlot and senior police officials but they did not pay attention for safety scj

First published on: 07-12-2023 at 09:57 IST
Next Story
विश्लेषण : इस्रायलचा दक्षिण गाझावर हल्ला… परिणाम काय?