पीटीआय, नवी दिल्ली

‘देशातील कोणतेही उच्च न्यायालय दोन आठवडय़ांनंतर वकील आणि याचिकाकर्त्यांना दूरदृश्य प्रणालीची (व्हिडिओ कॉन्फरिन्सग) सुविधा नाकारू शकणार नाही. तसेच प्रत्यक्ष अथवा दूरदृश्य प्रणालीच्या संमिश्र पद्धतीद्वारे (हायब्रीड मोड) सुनावणीस नकार देऊ शकणार नाही. न्यायमूर्तीच्या आवडीनिवडीवर आता तंत्रज्ञानाचा वापर अवलंबून नसेल,’ असे सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी स्पष्ट केले.

Governor, MLA, Court,
उद्या कोणी याचिका करून पद्म पुरस्काराची मागणी करेल, उच्च न्यायालयाचे हस्तक्षेप याचिका करणाऱ्यांना खडेबोल
Supreme Court verdict on minor abortion
तिसाव्या आठवडयात गर्भपातास परवानगी; अल्पवयीन बलात्कार पीडितेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
supreme court
नुकसानभरपाईच्या पुनरावलोकनाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; हवाई दल अधिकाऱ्याला एचआयव्ही संसर्ग
mumbai high court, Senior Citizens, Maintenance Act, Misuse in Property Disputes, Tribunal s Role Emphasized, property disputes, property disputes in senior citizens,
मालमत्ता वादात कायद्याचा गैरवापर, उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती

उच्च न्यायालयांमध्ये ‘हायब्रीड’ पद्धतीने सुनावणी व्हावी यासाठी तंत्रज्ञानाचा कमीत कमी वापर केल्याबद्दल नाराजी व्यक्त करत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने ही पद्धत बंद होऊ नये, यासाठी अनेक आदेश दिले.

हेही वाचा >>>Sikkim flood: सिक्कीममध्ये पूरबळी २२ वर, १०३ बेपत्ता; मृतांमध्ये लष्कराचे सात जवान

 खंडपीठाने नमूद केले, की या आदेशानंतर दोन आठवडय़ांनी कोणतेही उच्च न्यायालय दूरदृश्य प्रणाली सुविधा किंवा संमिश्र प्रारुपाद्वारे वकील अथवा याचिकाकर्त्यांची सुनावणी घेण्यास नकार देणार नाहीत. सर्व उच्च न्यायालयांना याबाबतची मानक कार्यप्रणाली (एसओपी) तयार करण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. केंद्रीय माहिती-तंत्रज्ञान (आयटी) मंत्रालयाला दूरदृश्य प्रणालीद्वारे सुनावणी सुविधेसाठी ईशान्येकडील राज्यांच्या न्यायालयांत योग्य इंटरनेट संपर्क सुविधा पुरवण्याचे आदेशही खंडपीठाने दिले.

तत्पूर्वी सर्वोच्च न्यायालयाने सर्व उच्च न्यायालये आणि काही न्यायाधिकरणांकडून खटल्यांच्या सुनावणीची ‘हायब्रीड’ पद्धत थांबवली आहे का, याबाबत उत्तर मागवले होते.

जर न्यायाधीश म्हणून जबाबदारी सांभाळताना  अद्ययावत तंत्रज्ञानाशी जुळवून घ्यावे लागेल. तंत्रज्ञानाचा वापर न्यायाधीशांच्या आवडीनिवडीवर अवलंबून नाही.- धनंजय चंद्रचूड, सरन्यायाधीश