scorecardresearch

Premium

सुब्रमण्यम स्वामींच्या अर्जावर निर्णय घेण्यासाठी न्यायालयाची केंद्राला मुदत

सरकारची या विषयावरील भूमिका स्पष्ट करण्याकरता चार आठवडय़ांची मुदत मिळावी,

supreme court, collegium
गेल्या दहा वर्षांत सर्वोच्च न्यायालयातील न्यायवृंदाने (कॉलेजियम) सर्वोच्च न्यायालयात नेमणुकीसाठी निवडलेल्या न्यायमूर्तींमध्ये केवळ तीनच महिला होत्या.

‘रामसेतू’ बाबतची याचिका
भारत व श्रीलंकेला जोडणारा पौराणिक ‘रामसेतू’ न तोडण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्यामुळे, २००९ साली आपण या संदर्भात केलेली याचिका मागे घेण्याची परवानगी मागणाऱ्या भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांच्या अर्जावर निर्णय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला चार आठवडय़ांचा वेळ दिला आहे.
सरकारची या विषयावरील भूमिका स्पष्ट करण्याकरता चार आठवडय़ांची मुदत मिळावी, ही केंद्र सरकारची बाजू मांडणारे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल पिंकी आनंद यांची विनंती सरन्यायाधीश न्या. एच.एल. दत्तू व न्या. अरुण मिश्रा यांच्या खंडपीठाने मान्य केली, मात्र सरन्यायाधीश २ डिसेंबरला निवृत्त होणार असल्याने, तसेच आपण या याचिकेची सुनावणी करणार नसल्याचे न्या. मिश्रा यांनी सांगितल्यामुळे ही सुनावणी दुसऱ्या खंडपीठापुढे होईल.
रामायणात वर्णन केलेला रामसेतू हा रामेश्वरमजवळील पंबन बेटाला श्रीलंकेच्या उत्तर किनाऱ्यावरील मन्नार बेटाशी जोडणारा चुनखडीचा उथळ पाण्यातील सखल भाग आहे. मन्नारला पाल्कच्या सामुद्रधुनीशी जोडण्याकरिता ८३ किलोमीटर लांबीचा बोगदा पाण्याखाली बांधणारा ‘सेतुसमुद्रम’ प्रकल्प संपुआ सरकारने आखल्यानंतर स्वामी यांनी त्याला आव्हान देणारी याचिका केली होती.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Supreme court grants time to centre for apprising its stand on rama sethu

First published on: 27-11-2015 at 01:31 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×