एपी, टोक्यो

गेल्या एप्रिलमध्ये जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यावर केलेल्या बॉम्बहल्ल्यासंदर्भात बुधवारी एका २४ वर्षीय संशयितावर खुनाच्या प्रयत्नासह अन्य आरोप तपास यंत्रणांनी लावले आहेत. जपानी प्रसारमाध्यमांत प्रसिद्ध झालेल्या वृत्तातून ही माहिती समोर आली आहे. किशिदा पश्चिम जपानमधील वाकायामा येथे प्रचार करत असताना एका व्यक्तीने त्यांच्यावर घरात बनवलेले ‘पाइप बॉम्ब’ फेकले होते.

Why has the government banned 23 dangerous dogs in the country
पिटबुल, रोटवायलर, अमेरिकन बुलडॉग… देशात २३ ‘धोकादायक’ श्वानांवर सरकारकडून बंदी का? श्वानप्रेमींचे बंदीविरुद्ध आक्षेप कोणते?
Suspect arrested from Yerawada area in view of Prime Minister visit pune print news
पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर येरवडा भागातून संशयित ताब्यात
police case marathi news, prithvi shaw marathi news
‘पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश द्या’, पृथ्वी शॉविरोधात गुन्हा न नोंदवल्याचे प्रकरण
lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची अखेरची धडपड

या हल्ल्यात किशिदा यांना कोणतीही इजा झाली नव्हती. परंतु सभेला उपस्थित असलेले दोन जण जखमी झाले होते. जपानच्या ‘क्योडो’ वृत्तसंस्थेने म्हटले आहे, की संशयिताच्या तीन महिने केलेल्या मानसिक मूल्यांकनानंतर, तपासकर्त्यांनी असा निष्कर्ष काढला, की २४ वर्षीय रियूजी किमुरा मानसिकदृष्टय़ा निरोगी असून, त्याच्याविरुद्ध खटला चालवता येऊ शकतो. त्याने हल्ल्यात वापरलेला बॉम्ब प्राणघातक होता, असाही तपासयंत्रणांचा निष्कर्ष आहे.

हेही वाचा >>>उदयनिधींच्या ‘सनातन धर्मा’वरील वक्तव्यावर पहिल्यांदाच बोलले पंतप्रधान मोदी, सर्व मंत्र्यांना म्हणाले…

न्यायालयाच्या कागदपत्रांवरून दिसते, की किमुरा गेल्या वर्षी निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करू शकला नसल्याने कदाचित संतप्त होता. माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची निवडणूक प्रचारादरम्यान गोळय़ा झाडून हत्येनंतर जवळपास वर्षभराने किशिदांवर हल्ला झाला. जपानमध्ये गोळीबार-बॉम्बहल्ल्याच्या घटना अत्यंत दुर्मिळ आहेत. आबे आणि किशिदा यांच्यावरील प्राणघातक हल्ल्यांनी जपानला हादरवले होते.