रशियाची राजधानी मॉस्कोमधील एका कॉन्सर्ट हॉलमध्ये दहशतवादी हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवारी रात्री (२२ मार्च) ही घटना घडली. यामध्ये तब्बल ११५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत असून १४५ पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती वर्तवली जात असून या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट ग्रुपने घेतली आहे.

israel iran tensions updates israel hits back at iran
पश्चिम आशियावर युद्धाचे ढग? इराणच्या इस्फान शहरावर इस्रायलचा ड्रोनहल्ला   
candidates chess 2024 vidit gujrathi beats nakamura
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा : विदितचा नाकामुरावर पुन्हा विजय, गुकेशची प्रज्ञानंदशी बरोबरी; नेपोम्नियाशीसह संयुक्त आघाडीवर
Iran Israel Attack Updates in Marathi
Iran Israel Attack : इराणचा इस्रायलवर हवाई हल्ला, शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्रे डागली! UN मध्ये आज तातडीची बैठक
what is quds force
इस्रायलने सीरियात इराणी जनरलला का मारले; कुड्स फोर्स कोण आहेत?

मॉस्कोमध्ये म्युझिक कॉन्सर्टसाठी हजारो लोक एकत्र जमले होते. यावेळी सहा ते सात हल्लेखोरांनी अचानक अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात अनेकजण जागीच ठार झाले. हे हल्लेखोर तब्बल १५ ते २० मिनिटे गोळीबार करत होते. यानंतर अचानक कॉन्सर्ट हॉलमध्ये आग लागली आणि स्फोटांचा आवाज झाला. यामध्ये ११५ पेक्षा अधिक जण ठार झाले.

रशियन वृत्तानुसार, या हल्लेखोरांनी मोठ्या प्रणाणात स्फोटके फोडली. कॉन्सर्ट हॉलमध्ये आग लावली. तर सोशल मीडियावरील व्हिडीओमध्ये इमारतीवरून धुराचे मोठमोठे लोट दिसून येत आहेत. हे हल्लेखोर सैनिकांच्या गणवेशात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. रशियन सैन्यानेही दहशतवाद्यांना प्रत्युत्तर दिल्याचे रशियाच्या संरक्षण मंत्र्यांनी म्हटले आहे. दरम्यान, या भीषण दहशतवादी हल्ल्याने मॉस्को शहर हादरले आहे.

मॉस्कोच्या कॉन्सर्ट हॉलमध्ये दहशतवादी हल्ला झालेल्या ठिकाणी अजून काही लोक अडकल्याची भिती आहे. तर काही लोकांना रशियन जवानांकडून रेस्क्यू केले जात आहे. जे जखमी झाले आहेत, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.

रशियन अधिकाऱ्यांनी काय सांगितले?


मॉस्कोच्या कॉन्सर्ट हॉलमध्ये हल्ला झाल्यानंतर रशियन प्रशासन अलर्ट आले असून विमानतळ, रेल्वे स्थानके आणि विविध शहरातील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. तर मॉस्को शहराच्या महापौरांनी सर्व कार्यक्रम रद्द केले असून शहरातील सिनेमागृह आणि संग्रहालये दोन दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती रशियन अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा : “…तर केजरीवाल भाजपाचे नवे शंकराचार्य झाले असते”, ठाकरे गटाचा मोदी सरकारवर हल्लाबोल; अजित पवारांचा केला उल्लेख!

रशियन जवान घटनास्थळी

कॉन्सर्ट हॉलमध्ये हल्ला झाल्यानंतर काही वेळातच रशियन लष्कराचे जवान घटनास्थळी पोहोचले. यानंतर रशियन लष्करांनी दहशतवादविरोधी कारवाई सुरु केली. दरम्यान, अमेरिकन दूतावासाने या हल्ल्याचा आधीच इशारा दिला होता, अशी माहितीही सांगण्यात येत आहे. रशियामधील काही वर्षांतील हा हल्ला सर्वात प्राणघातक हल्ला असल्याचे बोलले जात आहे.

हॉलचे दरवाजे बंद करत गोळीबार

कॉन्सर्ट हॉलमध्ये जवळपास सहा ६ हजारांहून अधिक प्रेक्षक उपस्थित होते. यावेळी हल्लेखोरांनी अचानक हल्ला केला. रशियन माध्यमांच्या रिपोर्ट्सनुसार, दहशतवाद्यांनी आधी सुरक्षा रक्षकांवर हल्ला केला. त्यानंतर कॉन्सर्ट हॉलचे दरवाजे बंद करत गोळीबार केला. यामध्ये अनेकांचा मुत्यू झाला.