अमृतसर : पंजाबच्या मन्सा जिल्ह्यात रविवारी सायंकाळी गोळय़ा झाडून हत्या करण्यात आलेले पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मूसेवाला यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूसा या मूळ गावी मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यसंस्काराला प्रचंड जनसमुदाय उसळला होता.  

मूसेवाला यांचे विविध राज्यांतील चाहते त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जमले होते. मूसा हे गाव मन्सा जिल्ह्यात आहे. २७ वर्षीय सिद्धू मूसेवाला यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी विविध भागांतील लोक मूसा गावाकडे निघाल्याने मंगळवारी त्या भागातील रस्त्यांवर वाहतूककोंडी झाली. त्यामुळे दूरवरून लोक पायी चालत भर उन्हात मूसा गावाकडे निघाले. पोलिसांनी परिसरात चोख बंदोबस्त ठेवला होता. अंत्यसंस्कारासाठी जमलेले चाहते काही तास ताटकळत राहिल्यानंतर मूसेवाला यांच्या आईवडिलांनी त्यांच्यासाठी जेवण आणि पेयजलाची व्यवस्था केली. मूसेवाला यांच्या घराबाहेर प्रचंड संख्येने जमलेल्या त्यांच्या चाहत्यांना आवरण्यासाठी सुरुवातीला पोलिसांना लाठीमारही करावा लागला.  

anurag thakur statement on rahul gandhi
“राहुल गांधींचं लग्न झालं नाही, म्हणून तुमच्या मुलांची संपत्ती ते…”, अनुराग ठाकूर यांचं विधान
ratnagiri sindhudurg lok sabha marathi news
रत्नागिरीत महायुतीपुढे कार्यकर्त्यांच्या मनोमिलनाचे आव्हान
AAP MP Sanjay Singh
“केजरीवालांचा तुरुंगात छळ होतोय”, आप खासदार संजय सिंहांचा आरोप; म्हणाले, “त्यांच्या पत्नीलाही…”
Prime Minister Modi criticism of Rahul gandhi Lalu Prasad Yadav regarding meat
श्रावण महिन्यात मटणावर ताव; पंतप्रधान मोदी यांची राहुल-लालूप्रसाद यांच्यावर टीका

सिद्धू मूसेवाला यांचे वडील बलकौरसिंग आणि आई चरणकौर सिद्धू यांना सातत्याने अश्रू अनावर होत होते. पंजाबमधील प्रथेनुसार अविवाहित सिद्धू मुसेवाला यांना अंतिम निरोप देताना त्यांच्या पार्थिवावर नवरदेवासारखा पोशाख चढविण्यात आला होता. मूसेवाला कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धू यांची हत्या होण्याच्या दोन दिवस आधीपर्यंत त्यांचे आईवडील सिद्धू यांची सोयरिक जमविण्याच्या प्रयत्नात होते.

आईने मुलाला सेहरा बांधला, वडिलांनी त्याच्या मिशांना पीळ भरला..

सिद्धू यांची आई ही गावची सरपंच असून त्यांनी सिद्धू यांचे केस विंचरून त्यांच्या डोक्याला पगडी बांधून सेहरा चढवला. सिद्धू यांच्या वडिलांनी आपल्या मुलाच्या मिशांना पीळ भरला. गायक सिद्धू हे त्यांच्या आल्बममध्ये मिशीवर ताव मारताना अनेकदा दिसतात. इतकेच नव्हे तर प्रतिस्पर्ध्याला आव्हान देण्यासाठी

पहिलवान जशी मांड ठोकतो, तशी मांडही सिद्धू यांच्या वडिलांनी पार्थिवाच्या मांडीवर आपल्या हाताने ठोकली. पार्थिव वाहून नेणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला वरातीच्या कारप्रमाणे सजविण्यात आले होते. चाहत्यांच्या घोषणा अखंड सुरू होत्या.