scorecardresearch

Premium

आम्हाला तुमचा अभिमान वाटतो! भारताच्या NDRF ने टर्कीत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या ६ वर्षांच्या मुलीला वाचवलं, पाहा Video

टर्की आणि सीरियात भूकंपानंतर मदतकार्यासाठी भारताने एनडीआरएफची पथकं टर्कीला पाठवली आहेत. भारताच्या जवानांनी टर्कीत आपल्याला अभिमान वाटेल अशी कामगिरी केली आहे.

NDRF team rescues girl in Turkey
टर्की आणि सीरियात भूकंपानंतर मदतकार्यासाठी भारताने एनडीआरएफची पथकं टर्कीला पाठवली आहेत.

टर्की आणि सीरियामध्ये आलेल्या भूकंपाने आतापर्यंत २१ हजारांहून लोकांचा बळी घेतला आहे. भूकंप आल्यापासून लोकांचं हृदय पिळवटून टाकणाऱ्या अनेक घटना, छायाचित्र आणि व्हिडीओ आपण पाहिले आहेत. परंतु यादरम्यान काही दिलासा देणारे क्षण देखील पाहायला मिळाले आहेत. असाच एक क्षण भारताच्याही वाट्याला आला. टर्कीत भूकंप आल्यानंतर तिथली परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात होती. अशावेळी भारतासह अनेक देशांनी टर्कीत बचाव पथकं पाठवली. भारताने एनडीआरएफच्या तीन टुकड्या आणि एक वैद्यकीय पथक टर्कीला रवाना केलं. भारताच्या एनडीआरएफचं एक पथख ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांसाठी देवदूत ठरतंय.

भारताने टर्कीत बचावकार्य सुरू केलं आहे. भारताने या मोहीमेला ‘ऑपरेशन दोस्त’ असं नाव दिलं आहे. या बचाव मोहीमेदरम्यान भारताच्या एनडीआरएफच्या जवानांनी ६ वर्षांच्या एका मुलीचा जीव वाचवला. ही चिमुरडी अनेक तास इमारतीच्या मलब्याखाली अडकली होती. भारताच्या जवानांची ही कामगिरी पाहून तुम्हाला त्यांचा अभिमान वाटेल.

Sony Group explores new opportunities after parting ways with Zee
‘झी’शी फारकतीनंतर सोनी समूहाकडून नवीन संधींचा शोध
indian government, fencing, indo-myanmar border, surveillance, chin national front, Mizoram, Manipur, Nagaland, Arunachal Pradesh
म्यानमारच्या सीमेवरले संभाव्य कुंपण कुणाला टोचणार?
loksatta readers opinion on editorial readers reaction on loksatta news
लोकमानस : एकाच अर्थसंकल्पात ५० वर्षांच्या गप्पा!
india vs england ks bharat believes indian team will make strong comeback in second test
इंग्लंडच्या आक्रमणाला प्रत्युत्तर देण्यासाठी नव्या योजनांसह सज्ज! दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाच्या दमदार पुनरागमनाचा भरतला विश्वास

NDRF च्या पथकाने ६ वर्षांच्या मुलीला वाचवलं

एनडीआरएफने टर्कीत चालवलेल्या ‘ऑपरेशन दोस्त’ मोहीमेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एनडीआरएफच्या एका पथकाने इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या ६ वर्षांच्या मुलीला वाचवल्याचं पाहायला मिळत आहे. या मुलीचं नाव बेरेन असं आहे.

हे ही वाचा >> टर्की-सीरियातल्या भूकंपामुळे २१ हजारांहून अधिक बळी, मलब्याखाली अजूनही शेकडो लोक अडकल्याची शक्यता

अमित शाह यांच्याकडून शाबासकी

गृहमंत्री अमित शाह यांनी देखील हा व्हिडीओ ट्विट केला आहे. त्यांनी ट्विट करत एनडीआरएफचं कौतुक केलं आहे. शाह यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिलं आहे की, “आम्हाला एनडीआरएफचा अभिमान वाटतो. टर्कीमध्ये सुरू असलेल्या बचाव मोहीमेदरम्यान भारतीय जवानांनी गाझियांटेप शहरात ६ वर्षांची मुलगी बेरेन हिला वाचवलं. पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनात आम्ही एनडीआरएफला जगातील सर्वात अग्रगण्य आपत्ती निवारण दल बनवण्यासाठी वचनबद्ध आहोत.”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Turkey earthquake india ndrf team rescues 6 year old girl from debris in watch video asc

First published on: 10-02-2023 at 13:15 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×