Udhayanidhi Stalin on Jai Shri Ram : तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे पूत्र तसेच तमिळनाडूचे युवक कल्याण आणि क्रीडामंत्री उदयनिधी स्टॅलिन पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. दोन दिवसांपूर्वी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या भारत-पाकिस्तान सामन्यातील एका प्रसंगावर उदयनिधी स्टॅलिन यांनी संताप व्यक्त केला आहे. या सामन्यादरम्यान पाकिस्तानचा फलंदाज मोहम्मद रिझवान बाद होऊन ड्रेसिंग रूमकडे परतत असताना स्टेडियममधील प्रेक्षकांनी ‘जय श्री राम’च्या घोषणा दिल्या. या घटनेवर उदयनिधी यांनी संताप व्यक्त केला आहे.

मोहम्मद रिझवान ड्रेसिंग रूमकडे जाताना प्रेक्षकांनी ‘जय श्री राम’च्या दिलेल्या घोषणा खेळभावनेच्या विरुद्ध कृत्य आहे. तसेच हे कृत्य एखाद्या खेळाडूला त्रास देणारं असल्याचं काही लोकांनी म्हटलं आहे. तर काही लोकांचं म्हणणं आहे की, रिझवाननेच याची सुरुवात केली. रिझवानचं मैदानावर नमाज पठणं करणं, क्रिकेटच्या मैदानात इस्रायल-हमास युद्धाचा उल्लेख करणं हेदेखील चुकीचं होतं. रिझवाननेच खेळाच्या मैदानात धर्म आणला.

Ashutosh Sharma's Reaction After Defeat
‘त्या प्रशिक्षकांना मी आवडत नसे, ते मला संघात घेत नसत. यामुळे मी नैराश्यात गेलो’, आशुतोष शर्माचा संघर्ष
Kolkata Knight Riders Vs Lucknow Supergiants Match Updates in Marathi
KKR vs LSG : कोलकाताविरुद्धच्या सामन्यासाठी लखनऊच्या संघाने जर्सीचा रंग का बदलला? जाणून घ्या
Mohammad Amir and Imad Wasim Returns to Pakistan National Team
फिक्सिंग, बंदी आणि निवृत्तीनंतर मोहम्मद आमिर पुन्हा पाकिस्तानच्या टी-२० संघात
Ravindra Jadeja Teases chepauk Crowd by Going For Batting Before MS Dhoni
IPL 2024: चेपॉकच्या मैदानावर जडेजाने घेतली चाहत्यांची फिरकी, धोनी आधी फलंदाजीला उतरला अन्… VIDEO होतोय व्हायरल

दरम्यान, तमिळनाडूचे क्रीडामंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर म्हटलं आहे, भारत देश आपली खेळभावना आणि आदरातिथ्यासाठी ओळखला जातो. आपल्या शेजारच्या देशातील खेळाडूंबरोबर जे झालं, ती कृती खालच्या स्तरावरची होती. हे सहन करण्यायोग्य नव्हतं. खेळाने देश एकत्र व्हायला हवा. लोकांमधलं प्रेम आणि बंधूभाव वाढायला हवा, लोकांमध्ये तिरस्कार पसरवण्याचं शस्त्र म्हणून खेळाचा वापर केला जाऊ नये.

हे ही वाचा >> Nithari Case : देशाला हादरवणारं निठारी हत्याकांड काय होतं? मोनिंदर पंढेर आणि सुरिंदर कोली कसे पकडले गेले?

मोहम्मद रिझवान या सामन्यात ४९ धावा करून बाद झाला होता. विश्वचषक स्पर्धेतील १२ व्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर ७ गडी आणि १९ षटकं राखून मात केली. दरम्यान, या सामन्याआधी पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन संघांमध्ये सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात रिझवानने १३१ धावांची शतकी खेळी केली होती. सामन्यानंतर त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. त्यावेळी रिझवानने त्याचं शतक गाझा पट्टीतल्या (पॅलेस्टाईन) लोकांना समर्पित केलं होतं.