रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्ष दिवेसेंदिवस तीव्र होत आहे. रशिनय सैनिक युक्रेनमधील महत्त्वाच्या शहरांवर हवाई हल्ले तसेच तोफगोळे डागत आहेत. रशियाने युक्रेनच्या सीमाभागात आपला हल्ला आणखीत तीव्र केला आहे. या पार्श्वभूीवर हृदय पिळवटून टाकणारी एक घटना घडली आहे. कीव्ह शहर परिसरातील एका गावाजवळ ३१ वर्षीय व्हॅलेरिया मॅकसेट्स्का या महिलेला रशियन सैनिकांनी गोळ्या घालून ठार केले आहे. व्हॅलेरिया आपल्या आईसाठी औषधाच्या शोधात घराबाहेर पडल्या होत्या.

व्हॅलेरिया मॅकसेट्स्का यांच्यासोबत नेमकं काय घडलं ?

nalasopara, Massive Fire at Dwarka Hotel, Fire at Dwarka Hotel nalasopara, fire in nalasopara, fire in nalasopara hotel, marathi news, fire brigade fire news,
नालासोपाऱ्यात गॅस गळतीमुळे भीषण आग, तीन जण जखमी; अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू
police officer died after being hit by a car while rushing to help the injured
जखमीच्या मदतीसाठी सरसावताना मोटारीने ठोकरल्याने पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू
Israel use of AI in war revealed in reports by Israeli and Palestinian journalists
इस्रायलकडून युद्धात ‘एआय’चा वापर? इस्रायली आणि पॅलेस्टिनी पत्रकारांच्या अहवालात खुलासा
iran attack israel
जग पुन्हा युद्धाच्या छायेत; इराण पुढच्या ४८ तासांत इस्रायलवर हल्ला करणार, भारताने नागरिकांना दिला इशारा…

रशियन सैनिकांनी व्हॅलेरिया मॅकसेट्स्का यांच्यासोबत त्यांची आजारी आई आणि वाहनचालक यांनादेखील गोळ्या घालून ठार केलं आहे. या घटनेमुळे रशियन सैनिकांवर सडकून टीका केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर व्हॅलेरिया यांनी युक्रेन सोडून जाण्यास नकार दिला होता. व्हॅलेरिया मॅकसेट्स्का एक प्रशिक्षित वैद्यकीय चिकित्सक असून त्या युद्धामध्ये जखमी झालेल्या युक्रेनीयन लोकांवर उपचार करत होत्या. मात्र रविवारी व्हॅलेरिया यांच्या आईचे औषध संपले होते. औषधाच्या शोधात असताना त्यांच्यासमोर रशियन सैनिकांचा ताफा आला. यावेळी रशियन सैनिकांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्याने त्यांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात व्हॅलेरिया यांच्यासोबतच त्यांची आई आणि वाहनचालकाचा मृत्यू झालाय.

व्हॅलेरिया USAID या अमेरिकन संस्थेसोबत काम करत होत्या. या संस्थेच्या माध्यमातून युक्रेमधील युद्धग्रस्त भागातील लोकांना त्या मदत करत होत्या. त्यांच्या मृत्यूच्या वृत्ताची USAID संस्थेशी जोडलेल्या सामंथा पॉवर यांनी पुष्टी केली आहे.