संयुक्त निवेदनात अमेरिकेचे शिक्कामोर्तब
भारत हा संरक्षण क्षेत्रात अमेरिकेचा मोठा भागीदार देश असून, संरक्षण व्यापार व तंत्रज्ञान हस्तांतरात अमेरिकेच्या मित्रराष्ट्रांसमान दर्जा दिला आहे, असे दोन्ही देशांतील संरक्षण सहकार्यावरील वाटाघाटीच्या दरम्यान अमेरिकेने स्पष्ट केले आहे.
रसद देवाणघेवाण समझोता कराराचे सूतोवाच अमेरिकेचे संरक्षणमंत्री अ‍ॅशटन कार्टर व भारताचे समपदस्थ मनोहर र्पीकर यांच्यातील गोवा येथील भेटीत करण्यात आले होते. या कराराला अंतिम रूप देण्यात आले असून, त्यामुळे दोन्ही देशांच्या बंदरांना भेटी, संयुक्त कवायती या गोष्टी शक्य होणार आहेत. याबाबतचा समझोता करार अजून झालेला नसला तरी तो अंतिम टप्प्यात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्यातील चर्चेनंतर काल संयुक्त निवेदन जारी करण्यात आले, त्यानुसार भारत हा मोठा संरक्षण भागीदार देश असल्याचे अमेरिकेने मान्य केले आहे. तंत्रज्ञान हस्तांतरातही अमेरिका भारताला मदत करणार आहे. दरम्यान, व्हाईट हाऊसने म्हटले आहे, की अध्यक्ष ओबामा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात महत्त्वाच्या संरक्षण करारांवर चर्चा झाली असून त्यांना अंतिम रूप देण्यात आले आहे. करारांना अंतिम रूप देण्याबाबत तसेच सागरी संरक्षणाच्या माहितीची देवाणघेवाण तसेच इतर बाबींवर समझोता कराराचा त्यात समावेश आहे. भारतात संरक्षण उद्योग सुरू करून त्यांचे जागतिक पुरवठा साखळी उद्योगांशी एकात्मीकरण केले जाईल. अमेरिकी कायद्यानुसार जेवढे शक्य असेल तेवढे तंत्रज्ञान हस्तांतर व इतर वस्तूंची निर्यात केली जाईल. लष्करी पातळीवर सहकार्य तसेच संयुक्त कवायती व प्रशिक्षण, आपत्ती व्यवस्थापन यात दोन्ही देशांची भागीदारी राहील, द्विपक्षीय संरक्षण सहकार्यास उत्तेजन देणारे करार केले जावेत असे मत मोदी यांनी व्यक्त केले. सायबर हॅकिंग व इतर गुन्हय़ांमध्ये माहितीची होणारी चोरी, संगणक सुरक्षा, अंतर्गत सायबर सुरक्षेसाठी माहिती मिळवण्याकरिता केली जाणारी विनंती व इतर बाबींवर या वेळी चर्चा करण्यात

अमेरिकेतील भारतीयांच्या सोयीसाठी सियाटल येथे नवीन वाणिज्य दूतावास
वॉशिंग्टन- अमेरिकेतील भारतीयांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी वायव्य अमेरिकेतील भागात सहावा वाणिज्य दूतावास सियाटल येथे सुरू करण्यात येणार आहे. परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या भेटीनंतर सांगितले, की सियाटल येथे नवीन वाणिज्य दूतावास सुरू करण्यात येईल. भारत व अमेरिका यांच्या संयुक्त निवेदनातही याचा उल्लेख करण्यात आला असून, त्यात म्हटल्यानुसार सियाटल येथे नवीन वाणिज्य दूतावास सुरू केला जात आहे. त्याचे ठिकाण आपसात सामंजस्याने ठरवण्यात आले आहे. वॉशिंग्टन, न्यूयॉर्क, सॅनफ्रान्सिस्को, शिकागो, हय़ूस्टन, अ‍ॅटलांटा येथे भारताचे वाणिज्य दूतावास आहेत. संयुक्त निवेदनात दोन्ही देशांनी लोकपातळीवर संपर्कासाठी काही नवीन उपाययोजनाही जाहीर केल्या आहेत. दोन्ही देशांच्या नागरिकांसाठी व्हिसा प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे. अमेरिकी प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार भारतातील राजनैतिक दूतावासात काम करणाऱ्या अमेरिकी लोकांना व्हिसा संख्या वाढवून देण्यात येईल. अमेरिकेत शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या १ लाख ३३ हजार असून, ती २०१४-१५ मध्ये १९ टक्क्यांनी वाढली आहे. अमेरिकी दूतावास व वाणिज्य दूतावास यांनी २०१५ या आर्थिक वर्षांत ७६ हजार विद्यार्थ्यांना व्हिसा दिला आहे. अमेरिकेतील विद्यार्थ्यांनाही भारतात शिक्षणाच्या संधी उपलब्ध केल्या जात आहेत. २०१५ मध्ये काही लाख अमेरिकी लोकांनी भारताला भेट दिली आहे.