पाकिस्तानला लष्करी आणि आर्थिक सहकार्यासाठी १.६ अब्ज डॉलरहून अधिक मदत देण्याचे आर्थिक संकटातून सावरणाऱ्या अमेरिकेने ठरविले आहे. आंतरराष्ट्रीय दहशतवादी ओसामा बिन लादेन याचा खातमा करण्यात आल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले होते.तथापि, आता दोन्ही देशांमधील संबंध पुन्हा सुधारल्याने सहकार्याचा ओघ सुरू झाला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्याशी चर्चा करण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ येत्या आठवडय़ात वॉशिंग्टनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. दरम्यान, अमेरिकेचे सार्वजनिक कर्ज हे काँग्रेसने दिलेल्या कर्जमर्यादा-वाढीमुळे आता १७ ट्रिलियन डॉलर इतके झाले आहे.