नवी दिल्ली : केंद्र सरकार अ‍ॅपल या स्मार्टफोन आणि उपकरणे निर्मात्या कंपनीला लक्ष्य करत असल्याचे ‘वॉशिंग्टन पोस्ट’ या अमेरिकेतील प्रतिष्ठित वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेले वृत्त माहिती आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी शुक्रवारी फेटाळले. ‘वॉशिंग्टन पोस्ट’चे वृत्त म्हणजे ‘अर्धवट तथ्य आणि पूर्ण सजावट’ असल्याची टीका चंद्रशेखर यांनी केली आहे.

हेही वाचा >>> ट्रम्प यांच्यावर अमेरिकेच्या मेन राज्यात निवडणुकीस बंदी

Action taken by Tihar administration after Delhi Chief Minister Arvind Kejriwal  blood sugar rises
केजरीवालांना इन्सुलिन; रक्तातील साखर वाढल्यानंतर तिहार प्रशासनाकडून कार्यवाही
Rana Kapoor gets bail in latest case will be out of jail after four years
राणा कपूर यांना अखेरच्या प्रकरणातही जामीन, चार वर्षांनंतर तुरुंगातून बाहेर पडणार
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा
aam aadmi party AAP
आपचे खासदार संजय सिंह यांना मिळालेल्या जामिनाचे कारण काय? त्यांच्या वकिलांकडून नेमका काय युक्तिवाद करण्यात आला?

‘‘भारत सरकारच्या हॅकरनी काही स्वतंत्र पत्रकार आणि विरोधी पक्षनेत्यांची अ‍ॅपलची उपकरणे हॅक करण्याचा प्रयत्न केल्यानंतर कंपनीतर्फे त्यांना इशारा देण्यात आला, त्यानंतर सरकारकडून अ‍ॅपलला लक्ष्य केले जात आहे’’ असे ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने २७ डिसेंबरच्या वृत्तात म्हटले आहे. मात्र, सरकारने ते फेटाळले आहे. ‘वॉशिंग्टन पोस्ट’चे वृत्त ‘भयंकर आणि कंटाळवाणे’ असल्याचेही त्यांनी एक्सवर लिहिले आहे. वॉशिंग्टन पोस्टने हे वृत्त ‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल’बरोबर सहयोगाने प्रसिद्ध केले आहे. भारतातील काही पत्रकारांच्या आयफोनमध्ये स्पायवेअरने हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला असे त्यामध्ये लिहिले आहे. ‘‘अ‍ॅपलने स्वतंत्र पत्रकार आणि विरोधी पक्षाच्या राजकीय नेत्यांना सरकार त्यांचा आयफोन हॅक करण्याचा प्रयत्न करत असल्याचा इशारा दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकाऱ्यांनी तातडीने अ‍ॅपलविरोधात कारवाई केली’, असा दावा ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या वृत्तामध्ये करण्यात आला आहे. ऑक्टोबर महिन्यात शशी थरूर, महुआ मोइत्रा यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी आपल्याला अ‍ॅपलकडून हॅकिंगचा इशारा देण्यात आल्याचे जाहीर केले होते.