जपानमध्ये पारंपरिक नेक मॅन फेस्टिव्हल दरवर्षी आयोजित केला जातो. यंदा २२ फेब्रुवारी रोजी या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाला १६५० वर्षांचा इतिहास आहे. परंतु, यंदाच्या उत्सवात ऐतिहासिक घटना घडणार आहे. कारण, यंदा या नेक मॅन फेस्टिव्हलमध्ये महिलाही सहभागी होणार आहेत. एनडीटीव्हीने साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जपानमधील नेक मॅन फेस्टिव्हल ‘हाडाका मात्सुरी’ या नावाने ओळखला जातो. महत्त्वाचं म्हणजे हा कार्यक्रम मंदिरात आयोजित केला जातो. जपानच्या आयची प्रांतातील इनाझावा शहरातील कोनोमिया देवस्थानद्वारे आयोजित करण्यात येत असलेला हा पारंपरिक कार्यक्रम आहे. यंदा २२ फेब्रुवारी रोजी हा कार्यक्रम होणार असून सुमारे १० हजार पुरुष यात सहभागी होणार आहेत. तर, ४० महिलांना या उत्सवात काही विधींमध्ये सहभागी होण्याची परवानगी दिली जाणार आहे. या विधी करण्याचा मान केवळ पुरुषांना होता. परंतु, यंदा स्त्रियांनाही हा विधी करण्याची परवानगी दिली जाणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Women to participate in japans naked man festival for the first time but conditions apply sgk
First published on: 24-01-2024 at 15:53 IST