हरियाणामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या युट्यूबर जोडप्याने सातव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. हरियाणाच्या बहादुरगड भागात एका इमारतीत जोडपे राहत होते. हे जोडपे युट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर व्हिडिओ कंटेट तयार करत असत. तसेच लघूपटही तयार करत असत. नुकतेच देहरादूनहून ते आपल्या पाच जणांच्या टीमसह बहादुरगड येथे राहण्यास आले होते. येथील रुहील रेसिडेन्सीमध्ये ते सातव्या मजल्यावर भाड्याच्या घरात राहत होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रीकरण संपल्यानंतर काल (दि. १२ एप्रिल) रात्री उशीरा जोडपे घरी परतले. रात्री दोघांमध्ये काही कारणामुळे भांडण झाले, त्यानंतर सकाळी सहा वाजता त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youtubers aged 25 and 22 who were in a live in relationship die by suicide in haryana kvg
First published on: 13-04-2024 at 17:52 IST