दिवाळी म्हणजे उत्सवी वातावरण, रोषणाई, झगमगाट, खरेदी, उत्साह आणि गेटटुगेदर. अगदी धमाल आणि कल्ला. या सगळ्याबरोबरच खाण्यापिण्याचीही चंगळ. गोडधोड आणि चमचमीत पदार्थांची रेलचेल. सणवार सुरु झाले की आरोग्याबाबत दक्ष असणारे (हेल्थ कॉन्शियस) लोक जास्तच दक्ष होतात. त्यातही दिवाळी म्हटली की, ४-५ दिवस बघायलाच नको. सकाळी यथेच्च फराळ, दुपारी मस्त गोडधोडाचा बेत, संध्याकाळी एकमेकांकडे शुभेच्छा देण्यासाठी गेल्यावर होणारा फराळाचा प्रेमळ आग्रह आणि त्याच्या जोडीला हॉटेल मधील सेलिब्रेशन. त्यातच चेंजसाठी काढलेल्या ट्रिप्स. या सगळ्यामध्ये डाएट आणि व्यायामाची ऐशी की तैशी !! पण फिकर नॉट, विचारपूर्वक खाणंपिणं आणि आरोग्य सांभाळण्यासाठी काही टिप्स आवर्जून वापरा आणि दिवाळी एन्जॉय करा. इतकेच नाही तर आपण जेवायला बोलवत असलेल्या लोकांच्या आरोग्याची काळजीही आपणच घ्यायला हवी. त्यामुळे गृहीणींनाही या टिप्स अतिशय उपयुक्त आहेत.

⦁ दिवाळीच्या दिवसांचं मेनू प्लानिंग करा. प्रत्येक मिल आणि पूर्ण दिवसाच्या खाण्यातील  कॅलरीजचा अंदाज घ्या.

Health Benefits of Avocado
झपाट्याने वजन कमी करणारे हिरव्या रंगाचे ‘हे’ फळ कापण्यापूर्वी स्वच्छ धुवा; तज्ज्ञ म्हणतात, अन्यथा पडेल महागात
Maharashtra Board Class 10th and 12th Result 2024 Date Time in Marathi
१०वी १२वीच्या निकालासंदर्भात मोठी बातमी! ‘या’ तारखेला निकाल लागण्याची शक्यता; कसा पाहाल? जाणून घ्या
summer
सुसह्य उन्हाळा!
Matka Hygiene know the mistakes while drinking matka water or clay pot water
उन्हाळ्यात माठातील पाणी पिण्याआधी ‘या’ गोष्टींची घ्या काळजी; अन्यथा…

⦁ कोणते पदार्थ खायचे आणि किती प्रमाणात खायचे याचं प्लॅनिंग आधीच करा आणि त्याप्रमाणे वागा.

⦁ एकाच वेळी खूप जास्ती कॅलरी असणारे पदार्थ खाऊ नका. कॅलरी विभागल्या जातील असा आहार ठेवा.

दिवाळीच्या खास पदार्थांमधून जाणाऱ्या जास्तीच्या कॅलरीजचा सामना करण्यासाठी  नेहमीच्या डाएटमध्ये थोडे बदल केल्यास ते आरोग्याच्यादृष्टीने फायद्याचे ठरु शकते.

१) जेवताना फुलका / पोळी किंवा भाकरी कमी खा.

२) भात बंद करा. किंवा वेगळा प्रकार असेल तर अगदी थोडा खा.

३) रोजच्या स्वयंपाकात तेलाचा वापर नेहमीपेक्षा कमी करा.

४) कोशिंबीर, वरणाला फोडणी देणे टाळा.

५) चहामध्ये अजिबात साखर नको.

खास पदार्थांसाठी हेल्दी  साहित्य वापरु शकता

१) फुल फॅट मिल्क ऐवजी लो  फॅट किंवा स्किम्ड मिल्क वापरा.

२) पनीर, दही, योगर्टही लो फॅट वापरा.

३) मैद्याऐवजी गव्हाचं पीठ वापरा.

४) बेसन किंवा हरभरा डाळीच्या पिठाऐवजी मिक्स डाळीचं पीठ वापरा.

५) फूड कलर्स आणि इसेन्स ऐवजी नैसर्गिक रंग आणि इसेन्स म्हणजेच वेलदोडा, जायफळ पूड, केशर, गुलाबाच्या पाकळ्या वापरा.

स्टीमिंग, बोयलिंग, रोस्टिंग, ग्रिलिंग, बेकिंग, पोचिंग, बार्बेक्यू करून बनवलेल्या पदार्थात तेलाचा वापर कमी असतो त्यामुळे कॅलरीज कमी आणि पौष्टीकता जास्त असते. स्टीम केलेला संदेश, उकडीचे मोदक किंवा कडबू किंवा उकळवून केलेला रसगुल्ला हा जिलबी किंवा गुलाबजाम पेक्षा चांगलं. खाण्यापिण्यावर खूप कठोर बंधन नको आणि खूप मोकळीकही नको. योग्य तो संयम आणि शिस्त पाळली तर तर निश्चितच ताण न घेता दिवाळीचा आनंद लुटता येईल.

सुकेशा सातवळेकर, आहारतज्ज्ञ