मधुमेहींनो दिवाळीत गोड खा पण…

काळजी घ्यायला हवी

दिवाळी म्हणजे गोडधोड, लाडू, करंजी आणि शंकरपाळे. दिवाळीच्या मेजवानीला बासुंदी, श्रीखंड नाही तर गुलाबजाम शिवाय मजा नाही. एकमेकांना भेट म्हणून द्यायची ती पण बर्फी किंवा मिठाईची !! डायबेटीस असणारे आणि वेट वॉचर्स यांना मात्र वजन आणि ब्लड शुगर यांवर नियंत्रण ठेवायचे असेल तर त्यांनी कोणते गोड पदार्थ खायचे, ते कसे बनवायचे, किती खायचे यासाठी काही खास टिप्स.

* गोड पदार्थ करताना साखरेचा वापर न करता नैसर्गिक गोड पदार्थ म्हणजे फळांचा वापर करा. आंबा, केळी, पपई, टरबूज, खरबूज, चिक्कू वापरून पदार्थाला गोडी येते. त्या बरोबरच व्हिटॅमिन अँटीऑक्सिडंटस आणि फायबरचा लाभही मिळतो.

* सुकामेव्यातल्या खजूर, बेदाणे, खारीक, सुकं अंजीर यांमुळेही पदार्थाला गोडी येते. शिवाय त्यांच्यातील आयर्न, काल्शियम आणि फायबर्स मुळे पोषकता वाढते.

* फळांचा आणि सुकामेव्याचा गोडवा पुरणार नसेल तर गूळ / गुळाचा चुरा किंवा काकवी वापरा. भरपूर आयर्न मिळेल. मध वापरला तर औषधी गुणधर्माचा फायदा मिळेल. गूळ आणि मधात साखरेपेक्षा कॅलरीज थोड्या कमी असतात पण त्यांचा वापरही मर्यादीतच करावा.

* घरी गोड पदार्थ बनवताना लहान, छोट्या आकाराचे बनवा. लाडू, करंजी, गुलाबजाम इ. छोटे बनवा. बर्फी, मिठाई, वडीचे तुकडे बारीक कापा. पक्वान्न वाढण्यासाठी छोटे चमचे वापरा. खाण्यासाठी छोटी वाटी, बाउल, चमचा वापरा.

* गोड पदार्थ आवश्यक प्रमाणातच बनवा. प्रमाणाबाहेर उरले तर घरात ठेऊ नका, वाटून टाका.

आर्टिफिशियल स्वीटनर्स

* अन्न व औषध प्रशासनाने मान्यता दिलेली सुक्रालोज पासून बनवलेली स्वीटनर्स तुम्ही साखरेऐवजी वापरू शकता.

* दिवसभरात ४-५ गोळ्या किंवा १ चमचा पावडर गोड पदार्थ बनवण्यासाठी वापरल्यास चांगले.

*स्वीटनर्स साखरेपेक्षा १०-१२ पट गोड असतात त्यामुळे त्यांचा कमी प्रमाणात वापर करा.

* स्वीटनर्स लो कॅलरी असतात. पण इतर घटक पदार्थातील कॅलरी आणि फॅटस लक्षात घ्या. म्हणजेच स्वीटनर वापरून बनवलेल्या बर्फीमध्ये हेवी कॅलरी आणि फॅटस असलेला खवा आहे हे विसरू नका.

* भारत सरकारने विक्रीसाठी तयार केलेल्या केवळ २० पदार्थांमध्येच स्वीटनर वापरण्याची परवानगी दिली आहे. तेव्हा विकतचे गोड पदार्थ घेताना खात्री करून घ्या.

* विकतच्या पदार्थात, काही वेळा गोडी वाढवण्यासाठी आणि पदार्थाचं वजन वाढवण्यासाठी साधी साखर सुद्धा वापरलेली असू शकते. त्याची योग्य ती खात्री करणे आवश्यक आहे.

सुकेशा सातवळेकर, आहारतज्ज्ञ

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व दिवाळी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: How to manage diet of diabetic people in festive season artificial sweeteners

ताज्या बातम्या