Diwali 2023 Recipes : दिवाळीच्या फराळ म्हटलं की चकली ही हमखास केली जाते. अनेकांना चकली प्रचंड आवडते. दिवाळीशिवाय हे लोक चकली आवडीने खात असतात. घरात केल्या जाणारी चकली ही भाजणीच्या पीठाची असते ज्यासाठी प्रंचड मेहनत करावी लागते. पण तुम्हाला माहितीये का तुम्ही भाजणीच्या पीठाशिवाय देखील चकली तयार करू शकता तेही कुरकुरीत आणि चविष्ट. होय विना भाजणीची चकली तयार करण्याच्या अनेक पद्धती आहेत पण आज आम्ही तुम्हाला तांदळाच्या चकलीची रेसिपी सांगणार आहोत. ही चकली अगदी झटपट तयार होते आणि त्यासाठी अगदी मोजकेच सामान लागते. चला तर मग जाणून घेऊ या रेसिपी

तांदळाची कुरकुरीत चकली रेसिपी

gokarnachya phulanchi neeli bhakri
ज्वारी, बाजरी नाही, तर गोकर्णाच्या फुलांपासून बनवा तांदळाची ‘निळी भाकरी’; ही घ्या भन्नाट रेसिपी
following low salt diet as it causes disruption to your sleep as well as weakens your bones read what expert said
अपुऱ्या मिठाच्या सेवनाचा तुमच्या झोपेवर होतो थेट परिणाम? रोज आहारात किती मीठ असावं? पाहा तज्ज्ञ काय सांगतात
viral video monkey trying to drink water from purifier on a kitchen counter seeking relief from its thirst
माकडाने स्वयंपाकघराच्या ओट्यावर मांडलं ठाण; पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे धाव, पाहा VIDEO
moong dal scrub for glowing skin
Skin Care Tips: मुग डाळीचा असा वापर कराल तर खऱ्या वयापेक्षा दिसाल लहान व तरुण; सुरकुत्या, पिंपल्सही होतील दूर!

साहित्य
तांदळाचे पीठ
मीठ
काळे तीळ
तळण्यासाठी तेल

हेही वाचा – दिवाळी स्पेशल : विकतच्या सारखी कुरकुरीत, चटपटीत बाकरवडी खायची आहे? मग नोट करा सोपी रेसिपी

कृती

एका भांडयात तांदळाचे पीठ घ्या, त्यात मीठ आणि काळे तीळ घ्या.
पाणी टाकून ते चांगले मळून घ्या.
त्यानंतर एका ताटलीवर पसरवून त्याला काटे चमच्याने सर्वत्र टोचे मारा.
हे पीठ वाफवून घ्या.
त्यानंतर थंड झाल्यावर ते हाताने पुन्हा मळून घ्या.
चकलीच्या साच्यामध्ये पीठाचा गोळा टाकून चकल्या तयार करा.
गरम गरम तेलामध्ये चकल्या तळून घ्या.
कुरकुरीत आणि चविष्ट तांदळाच्या चकल्या तयार आहेत.